मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…

पाटणा (बिहार): शाळेतील शिक्षकाचा आणि मुख्याध्यापकाचा एकाचवेळी शिक्षिकेवर जीव जडला. दोघेही शिक्षिका माझीच असल्याचे सांगू लागले. मुख्याध्यपकाने यानंतर 50 हजार रुपयांची सुपारी देत शिक्षकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान याच्यासह सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रामाश्रय यादव असे हत्या झालेल्या मास्तराचे नाव आहे. रामाश्रय यादव हे महिला शिक्षिकेसोबत शाळेत जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. ही घटना बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वरस्थान पोलीस स्टेशन परिसरात घडली. रामाश्रय यादव नावाच्या शिक्षकाची 28 जानेवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ते बुलेटने प्राथमिक शाळा आदलपूर येथे जात होते. त्यांच्यासोबत महिला शिक्षिकाही होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान याचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत.

आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले की, रामाश्रय यादव याचे शाळेतील एका शिक्षकेशी प्रेमसंबंध होते. मुख्याध्यापकालाही ती महिला शिक्षिका आवडत होती. त्यामुळे मुख्याध्यापकांनी रामाश्रय यादवला मार्गातून हटवण्याची योजना आखली. मुख्याध्यापकाने हत्येची सुपारी हीरा यादव आणि इतर हल्लेखोरांना दिली होती. हीरा यादव या शिक्षकाच्या येण्या-जाण्याची माहिती ठेवत होता. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी तीन सहरसा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एक सुपौल येथील तर तीन दरभंगा येथील आहेत. रंजन यादव उर्फ ​​निरंजन यादव, सुबोध कुमार, प्रभाकर यादव, लालो यादव, हीरा यादव, रामचंद्र पासवान आणि शंभूकुमार चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसाचे धावत्या कारमध्येच अश्लिल चाळे अन् Video झाला व्हायरल…

विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार अन् मुख्याध्यापकाची आत्महत्या…

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…

शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला वारंवार अत्याचार अन् गर्भपातही…

शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!