राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांचा लोणावळा दौरा; चोख बंदोबस्त, वाहतूकीत बदल…

पुणे (संदीप कद्रे): भारताच्या राष्ट्रपती द्रोपती मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्र येथे भेट देवून आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न करणार आहेत. या दौ-याच्या निमित्त प्रशासन सज्ज झाले असून, पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

राष्ट्रपती मद्रोपती मुर्मू या आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र नियोजित कार्यक्रमासाठी जाणार असुन, सुरक्षेच्या उपायोजना म्हणून पोलिस प्रशासनाकडून आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम या मार्गावरील वाहतूक राष्ट्रपती महोदया यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील वाहतुकीमध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३६ अन्वये बंदोबस्ताचे मुख्यमार्गावरील वाहतूक २९/११/२०२३ रोजी दुपारी १४:०० वा ते सायंकाळी १७:०० वा यावेळेत अंशतः निर्बंध घालण्यात येत आहे. सदर बाबत पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३६ अन्वये आदेश पारीत करण्यात आले आहे. तसेच नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

पर्यायी मार्ग…
→ पुणे बाजुकडून एक्सप्रेस वे वरुन येणारी वाहने ही लोणावळा येथे न येता एक्सप्रेस वे ने मुंबई कडे जातील तसेच पुणे कडून जुन्या हायवे ने येणारी वाहने ही कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस वे ने मुबई बाजुकडे जातील.
> मुंबई बाजुकडून एक्सप्रेस वे ने येणारी वाहतूक ही खंडाळा एक्झीट येथून खाली न उतरता पुणे बाजुकडे सरळ जातील. तसेच लोणावळा एक्झीट ने खाली येवून पुणे बाजुकडे जातील.
> लोणावळा शहरातील वाहन धारकांनी सदर वेळेत आपली वाहने शक्यतो आणू नये. ड्रोन, पॅराग्लायडींग तसेच एअर बलून असे लोणावळा शहर व परीसरात उडडाणास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड…

लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…

लोणावळा परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!