बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…

बीड : दोन युवकांकडून दिवसाढवळ्या एका युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली आहे. राजकुमार साहेबराव करडे (वय 30, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) हा युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड घटनेने जिल्हा हादरून गेलेला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर सारडा नगरी जवळ दोन युवकांनी राजकुमार साहेबराव करडे (वय ३०, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर कोयता सदृश्य धारदार हत्याराने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

राजकुमार करडे हा दोन वर्षापासून शॉर्ट फिल्म बनवत होता. सनई येथील एका युवतीशी त्याचे प्रेम संबंध होते. परंतु, युवतीच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता. नेहमी मला माझ्या मुलीचा नाद सोड नाहीतर जिवे मारून टाकू अशा धमक्या देत असल्याचे राजकुमार करडे याने आईला सांगितले होते. वैजनाथ शिंदे, वेदांत शिंदे या बाप लेकासह आदिनाथ भांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलिस करत आहेत.

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

बीडमध्ये महिलांचा समावेश असलेल्या गुन्हेगारी टोळीवर मकोका…

बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…

बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!