युवतीने 22व्या मजल्यावरुन मारली उडी; शरीराचे दोन तुकडे…

मुंबईः विक्रोळी पूर्वेला असणाऱ्या कन्नमवार नगरमध्ये सोमवारी रात्री एका युवतीने 22 मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरुन खाली उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’

हर्षदा तांदोलकर (वय 25) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक 97 मध्ये हा प्रकार घडला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे विक्रोळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हर्षदा तांदोलकर हिने सोमवारी रात्री इमारतीच्या 22 व्या मजल्यावर असलेल्या टेरेसवर जाऊन खाली उडी टाकली. इतक्या उंचावरुन खाली पडल्यामुळे या तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. हे दृश्य अंगावर अक्षरश: काटा आणणारे होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन या युवतीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक! बहिणीला प्रपोज केल्याने युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून…

बीडमधील भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू…

नवी मुंबईत धावत्या बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या दोघांना शिक्षा…

महाराष्ट्र हादरला! बॅंकेतील मॅनेजर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या…

पुणे जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला; मृतांमध्ये दीड वर्षांचे बाळ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!