बीड! मुंडे गँगकडून मारहाणीनंतर अजित पवार प्रथमच परळीत…

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज (सोमवार) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात जात आहेत. परळीत मुंडे गँगच्या धुडगुसीचा नवा व्हिडीओ समोर आल्याने अजित पवार यांचा दौरा चर्चेत आला आहे.

अजित पवार सकाळी आठ वाजताच परळीत दाखल झाले आहेत. साडे आठ वाजता श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनाने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचे सादरीकरण यावर चर्चा केली जाणार आहे. अजितदादांच्या या दौऱ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे हे आहेत.

अजित पवार हे आज परळी, अंबाजोगाई आणि बीडमध्ये विविध बैठका घेतील. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची दुसरी बैठक संपन्न होईल. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. नियोजन समितीची दुसरी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. मंत्री अजित पवार यांच्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत.

बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात विरोधक अजित पवार यांना घेरण्याची शक्यता आहे. परळीमधील शिवराज दिवटे या युवकाला झालेल्या बेदम मारहाण प्रकरणावर आज वादळी चर्चा होऊ शकते. परळीत शिवराज दिवटे याला मारहाण करताना मुंडे गँगचा धुडगूस पाहायला मिळाला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ पाहून अजित पवार यांनी बीडचे पोलीस प्रमुख नवनीत कॉवत यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मारहाण प्रकरणातील आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे कुणीही असू द्या किंवा विरोधी पक्षाचे असू द्यात, त्यांना सोडू नका. चांगली अद्दल घडवा, अशा शब्दात अजित पवार यांनी कॉवत यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

बीड! परळीत मुंडे गँगकडून युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण, पाहा भयानक Video…

बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…

बीड! अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू…

बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार

बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!