बीड! परळीत मुंडे गँगकडून युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण, पाहा भयानक Video…

बीडः परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या युवकाचे अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. बीडमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे या युवकाला बेदम चोप देताना दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार बेदम मारहाण करत आहेत. या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत आहेत. यावेळी शिवराज दिवटे जोरजोरात ओरडत होता. मात्र, तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत राहिले. या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे याचे अपहरण‌ करण्यात आले होते. शिवराज हा जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरुन परतत होता. त्यावेळी त्याचे अपहरण झाले. यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली. दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडीओ देखील चित्रीत केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान, याप्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…

बीड! अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू…

बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार

बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!