बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार

बीड: बीडमध्ये सगळ्या गँग आहेत, राखेची गँग, वाळूची गँग या सगळ्या गँग आहेत. या सगळ्या गँगना सुतासारख्या सरळ करणार आहे, असा इशारा राज्याची उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवार) दिला आहे. अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. युवा संवाद मेळाव्यातून अजित पवार यांनी राख गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचे सांगितले.

अजित पवार म्हणाले, ‘बीड ही देवदेवतांची भूमी आहे. जनतेची सेवा करण्यासाठीचे बळ देण्याचे देवदेवतांना साकडे आहे. बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत. बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात अनेकदा वाद दिसून आले असून, जाती-जातीतील दुरावा आपल्याला संपवायचा आहे. प्रतिमा स्वच्छ ठेवा.’

‘यशवंतराव चव्हाण यांचं बेरजेच राजकारण आपल्याला करायचे आहे. कार्यकर्ते घेत असताना रेकॉर्ड बघा. आपल्या बाजूला चुकीच्या प्रकृतीचे लोक नकोत. माझ्या कामाची पद्धत आणि इथच्या कामाच्या पद्धतीत तफावत आहे. मी अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. यात महत्वाच्या कामाचा पाठपुरावा केला जाईल. 200 कोटी रुपयांची गुंतवणूक इथे केली जाणार आहे. बेरोजगारी, शिक्षण, व्यवसाय, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहचवा. सोशल मीडियावरून तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करू नका. दादागिरी खपून घेतली जाणार नाही. धागेदोरे लांबपर्यंत पोहचत असतील, त्यावर पण कारवाई केली जाईल,’ असाही इशारा अजित पवार यांनी दिला.

बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

बीडमध्ये महिलांचा समावेश असलेल्या गुन्हेगारी टोळीवर मकोका…

बीड! शिक्षक धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!