कुडजे गावात मुलीला अंगणात खेळताना दिसला सात फुटी अजगर…

पुणे: कुडजे गावातील एका फार्महाऊसवर गुरुवारी (ता. ५) सायंकाळी सात वाजता तेथील सुरक्षारक्षक नवनाथ पुरी यांची मुलगी तेजस्विनी ही अंगणात खेळत असताना तिला अजगर दिसला. अजगर सात फुट लांब होता.

नवनाथ पुरी यांनी तत्काळ गावचे पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांना फोन करून माहिती दिली. पोलिस पाटील यांनी घटनेची माहिती उत्तमनगर पोलिस स्टेशन आणि वनविभागाला ताबडतोब दिली. काही वेळातच वेळात सर्पमित्र पंकज काळे, पृथ्वीराज काळे व स्वप्नील तनपुरे यांनी घटनास्थळी येऊन अजगराला पकडले आणि एनडीएच्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले.

कुडजे गावचे पोलिस पाटील दत्ता पायगुडे म्हणाले, ‘गेल्या महिन्यात आमच्या शेजारील आगळंबे गावात ऐंशी किलो वजनाचा अजगर सापडला होता. त्याच जातीचा हा अजगर आहे. शेतकरी आणि आमची मुकी जनावरे जंगलात असतात त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटते. शेतकरयांना शेतात काम करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.’ यावेळी पोलिस पाटील दत्ता पायगुडे, सर्पमित्र पंकज काळे, पृथ्वीराज काळे, सामाजिक कार्यकर्ते अजित पायगुडे,नवनाथ पुरी उपस्थीत होते.

सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…

हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…

मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!