
सैफ खरंच जखमी होता की, फक्त अॅक्टिंग? रिक्षा चालकाने सांगितलं…
मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात मध्यरात्री घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला केला होता. एवढ्या गंभीर दुखापतीनंतर सैफ अली खान रुग्णालयातून अगदी व्यवस्थित चालत कसा आला? एवढ्या लवकर त्याची रिकव्हरी कशी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात सैफला जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयापर्यंत सोडणाऱ्या रिक्षाचालकाने माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सैफ अली खान याच्या दुखापतींच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संजय निरुपम यांनी प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली होती आणि सैफच्या प्रकृतीबद्दल शंका उपस्थित केली होती. संजय निरुपम यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘पाठीत चाकू रुतणं आणि सर्जरीनंतर लगेचच अभिनेता इतका तंदुरुस्त असणं, आश्चर्यकारक नाही का?” मंत्री नितेश राणे यांनीही सैफच्या दुखापतींबद्दल शंका व्यक्त केली होती.
सैफ अली खान याला रुग्णालयात घेऊन जाणारा ऑटो रिक्षा चालक भजन सिंह राणा याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘हल्ला झाला त्यावेळी सैफला खरंच गंभीर दुखापत झाली होती, तो नाटक करत नव्हता. जेव्हा मी पहिल्यांदा सैफ अली खान याला पाहिले तेव्हा त्याचा कुर्ता रक्तानं माखलेला होता आणि त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होते. सैफला नेताना रिक्षामध्ये तिघेजण होते. सैफसोबत एक लहान मुलगा होता आणि आणखी एक व्यक्ती होती. ज्यावेळी मी त्यांना पाहिलं, त्यावेळी मला अजिबात वाटलं नाही की, सैफ अली खान नाटक करत आहे. जखमा ताज्या होत्या आणि सैफ रक्तबंबाळ अवस्थेत होता. त्यांना अशा अवस्थेत पाहून मी आधी हादरलो होतो आणि विचार करत होतो की, लवकरात लवकर इथून निघून जायला पाहिजे. मी घाबरलो होतो. ”
‘मी रिक्षाचालक म्हणून काम करतो. सामाजिक कार्यकर्ते फैजान अन्सारी यांनी मला 11,000 रुपयांची मदत केली. सैफ अली खाननं मला 51 हजार रुपये देऊन आर्थिक मदत केली, पण मी कोणाकडेही मागितले नाही. जर कोणी मला ते दिले तर मी ते घेतो, असे रिक्षा चालक भजन सिंह राणा यांनी म्हटले आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणी मोठा ट्विस्ट; अटकेत असलेला आरोपी…
अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट…
सैफ अली खानच्या घरात 12 जण असताना हल्लेखोर पळाला कसा? करिनाने तर…
सैफ अली खानवरील हल्लेखोराने पोलिसांना सांगितला ओलीस ठेवण्याचा ‘मास्टरप्लान’…
अभिनेता सैफच्या घरात कसा घुसला? आरोपीने सगळंच सांगितलं; बांगलादेशला पळणार तोच…
अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोराला अटक; खरं नाव समोर…
करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…
अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

