Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी
पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालला जामीन, पण…
पुणे: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. मात्र इतर दोन गुन्ह्यात तो न्यायालयन कोठडीत राहणार असल्यामुळे त्याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे.
मुंबईच्या कॉलेजचे 34 विद्यार्थी पिकनिकला गेले, तलावात बुडून तिघांचा मृत्यू
मुंबईः वांद्रा येथील रिझवी कॉलेजचे 37 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खालापूरमध्ये फिरायला गेले होते. खालापूरजवळच्या तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण अत्यवस्थ आहे. एकलव्य सिंग, इशांत यादव, आकाश माने आणि रणत बंडा अशी बुडालेल्या चौघांची नावे आहेत.
ठाणे येथे इमारतीचा पत्रा पडल्याने 8 मुलं गंभीर जखमी
ठाणे : ठाण्यातील गावंड बाग परिसरात एका इमारतीचा पत्रा उडून खाली असलेला फुटबॉल टर्फवर पडल्यामुळे त्या ठिकाणी खेळत असलेली आठ मुलं गंभीर जखमी झाली आहेत. जखमी विद्यार्थ्यांना ठाण्यातील बेथनी रुग्णालयामध्ये प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बड्या नेत्याच्या घरातून 1 कोटी आणि 100 काडतुसे जप्त
रांची (झारखंड): जमीन व्यावसायिक कमलेश कुमार यांच्या घरांवर ईडीने छापा टाकला. तपासादरम्यान 1 कोटी रुपये रोख, एक पिस्तूल आणि 100 जिवंत काडतुसे सापडली आहेत.
धोकादायक रिल्स बनवणाऱ्या युवक-युवतीवर गुन्हा दाखल
पुणेः उंचावर लटकून धोकादायक रिल्स बनविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युवक-युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहान भावाने संपत्तीच्या वादातून केला मोठ्या भावाचा खून
गोंदिया : संपत्तीचा वादातून वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना गोंदिया तालुक्यातील इर्री येथे घडली. हरिराज प्रेमलाल मेंढे (वय ३३, रा. इर्री) असे मृताचे नाव आहे. मुन्ना प्रेमलाल मेंढे (वय २७, रा. इर्री) असे आरोपी लहान भावाचे नाव आहे.
साखरपुड्यानंतर अत्याचार; ९ लाख घेत लग्नाला नकार
उदगीर (जि.लातूर) : साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केला, शिवाय ९ लाख रुपये घेऊन लग्नाला नकार दिल्याची घटना उदगीर शहरात घडली.
भानामती करीत असल्याच्या संशयावरून जिवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : पुणे शहरात भानामती करीत असल्याच्या संशयावरून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
नाशिकमध्ये झाडावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
नाशिक: औद्योगीक वसाहतीतील मायक्रोपेंट कंपनीच्या आवारातील झाडावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाबासाहेब रामभाऊ दुधोंडे (३६ रा.अंबड) असे मृत कामगाराचे नाव आहे.
पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकावर गुन्हा दाखल
बीडः पोलिस भरतीसाठी आलेल्या एक उमेदवारावर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतलं. यावेळी त्याने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…