वाघोलीत मुली सोबत बोलतो म्हणून अल्पवयीन मुलाची केली हत्या…

पुणे : मुलीचे वडील, तिचा भाऊ आणि आणखी एकाने मिळून अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोली येथे घडली आहे. गणेश वाघू धांडे (वय १७, रा. वाघेश्वर नगर, गोरे वस्ती, वाघोली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

वाघोली पोलिसांनी नितीन पेटकर (वय 31), सुधीर पेटकर (वय 32) आणि लक्ष्मण पेटकर (वय 60) या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही गणेश राहतो त्याच वाघेश्वर नगरच्या गोरे वस्तीमध्ये राहतात. मृत गणेश याचे वडील वाघू मारुती धांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. गुरुवारी (ता. 2) रात्री 12.30 वाजता पेटकरच्या घरासमोर गोरे वस्ती भागात या तिघांनी गणेशवर हल्ला केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मोटरसायकलवरून त्याच्या मित्रांसोबत घरी येत होता, त्यावेळी पेटकरने गणेशला अडवले. मुलीशी का बोलतो म्हणून गणेशला पेटकरने शिव्या दिल्या आणि मारहाण करायला सुरूवात केली. यानंतर पेटकर, त्याचा मुलगा आणि आणखी एकाने गणेश याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि दगडही टाकण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या गणेशचा मृत्यू झाला. वाघोली पोलिसांनी तीनही हल्लेखोरांना अटक केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पुणे विमानतळाजवळ दीर-भावजयीचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…

पुणे! आमच्या आधी मटण का खालं? मित्राने घातला डोक्यात फावडा…

पुणे शहरात पिस्टल जवळ बाळगणाऱ्यास सहकारनगर पोलिसांनी घेतले ताब्यात…

पुणे शहरातील पोलिसकाकाच्या प्रसंगावधानाने वाचले युवतीचे प्राण!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!