सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी याचे अपघाती निधन; चाहत्यांना धक्का…

कल्याण : सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी याचा शनिवारी (ता. 13) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घरी जात असताना मोहनी परिसरात अपघात घडला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून त्याचे नियंत्रण सुटले. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यामुळे एकच खळबळ उडाली. रीलस्टार प्रेम भाटीच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याने त्याच्या मनोरंजक आणि विनोदी रील्समुळे सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता.

प्रेम भाटी हा अवघ्या 10 ते 15 मिनिटांपूर्वी पत्नीला माहेर सोडून आला आणि घरी पोहोचणार होता. घरापासून हाकेच्या अंतरावर असतानाच अपघात झाला. प्रेमच्या मृत्यूमुले एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रेम भाटी हा सोशल मीडियावर रील्स बनवत असल्याने संपूर्ण शहरात ओळखळा जायचा. पण अपघाताचे कारण समोर येताच प्रत्येकाचा संताप होत असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

प्रेम भाटी याच्या पत्नीच्या भावाची तब्येत बिघडली होती. त्यामुळे प्रेम स्वत:तिला सोडण्यासाठी कल्याणमधीलच योगिधाम परिसरात गेला होता. त्यानंतर पत्नीला माहेरी सोडले आणि आपल्या घरी जाण्यासाठी तो परत निघाला असताना अपघात झाला आहे. प्रेम भाटीचे वडिल कमल यांचे हेअर स्टाईलचे दुकान आहे. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अपघात मोहणे येथील शिवसेना शाखेजवळ झाला. या भागात रस्त्याचे काम सुरू होते. रस्त्यावर विखुरलेल्या खडीमुळे व इतर बांधकाम साहित्यामुळे प्रेमचे वाहनावरील नियंत्रण सुटले, असावे असा प्राथमिक अंदाज आहे.

सोशल मीडियावर रीलस्टार प्रेम भाटी प्रचंड लोकप्रिय होता. कॉमेडी हॉरर अशा प्रकारचे रील तो शेअर करायचा.त्याचे instagram वर 83,000 फॉलोवर्स तर youtube वर तीन मिलियन सबस्क्राईबर्स आहेत. प्रेम भाटी याचा अकाली निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!