महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत अनेकांचा गुदमरून मृत्यू…

प्रयागराज (उत्तर प्रदेश): प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा दरम्यान आज (बुधवार) मध्यरात्री एक वाजताच्य सुमारास चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 15 जणांचा मृत्यू तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका. गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ असाल तिथं स्नान करा, संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं.

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘स्नानासाठी अनेक घाट बनवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाविकांना प्रशासनाच्या निर्देशांचं पालन करण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. फवांवर विश्वास ठेवू नका.’ स्वामी रामभद्राचार्य यांनी महाकुंभमध्ये येणाऱ्या भाविकांनी संगमावर स्नान करण्यात आग्रह सोडावा, असे आवाहन केले. तुमच्यापासून जो घाट जवळ असेल तिथे स्नान करावे, असे त्यांनी म्हटले आहे. लोकांनी आपल्या शिबिरातून बाहेर पडू नये, एकमेकांची सुरक्षा करावी अन् अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेतली आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेनंतर महाकुंभमेळ्यातील नियोजनातील अव्यवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरले आहे. अखिलेश यादव यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत, ज्यामध्ये गंभीर जखमींना एअर अॅम्ब्युलन्स द्वारे चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात यावे. मृत व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा. जे लोक हरवले आहेत त्यांना पुन्हा त्यांच्यासोबतच्या लोकांसोबत भेटण्यासाठी मदत करा. हेलिकॉप्टरचा चांगला वापर करा. सतयुगापासून सुरु असलेल्या शाही स्नानाच्या अखंड आणि अमृत परंपरांना पाहता सुरक्षा व्यवस्था करुन मौनी अमावस्येचे शाही स्नान पार पाडावे, असे अखिलेश यादव म्हणाले.

पोलिस भरती! सरकार 10 हजार पदांची करणार भरती…

सैफ अली खान हल्ला प्रकरणी बंगालमधून महिलेला केली अटक…

कर्नाटकमध्ये भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!