
धक्कादायक! डॉक्टर महिलांना गुंगीचे औषध देऊन करायचा बलात्कार अन्…
नागपूर : डॉक्टर मानसोपचार करण्याच्या नावाखाली महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता. शिवाय, त्याने पीडित महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओज देखील शूट केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली असून, खळबळ उडाली आहे.
आरोपी डॉक्टर नागपुरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मानसोपचार केंद्र चालवतो. तो नैराशाच्या गर्तेत असलेल्या महिला आणि मुलींसाठी शिबीर घेत होता. शिबीर घेण्याच्या नावाखाली तो महिलांना बाहेरगावी घेऊन जात असायचा. याठिकाणी आरोपी महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता. शिवाय, बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो काढत असे. आरोपीने अनेक महिला आणि मुलींसोबत हा प्रकार केला आहे.
पीडित महिलांचे व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे आरोपी त्यांना ब्लॅकमेल करत त्यांचे शारिरीक शोषण करत असे. बदनामीच्या भीतीने पीडित महिला निमूटपणे आरोपीचा अत्याचार सहन करत होत्या. नोव्हेंबर महिन्यात एका युवतीने हिंमत दाखवत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. यानंतर जानेवारी महिन्यात इतर चार महिलांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्व महिलांवर आरोपीने अशाच प्रकारे गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आहे. आरोपीने इतरही काही महिलांना अशाप्रकारे ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवतीचा डॉक्टरने केला विनयभंग…
डॉक्टर बलात्कार आणि हत्या! पोलिसांच्या तीक्ष्ण नजर अन् आरोपीचे फुटलं बिंग…
डॉक्टरने महिला डॉक्टरला नामांकित हॉटेलमध्ये नेऊन पाजली दारू अन्…
धक्कादायक! डॉक्टर महिलेने प्रियकर नगरसेवकाचे कापले गुप्तांग…
डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…

