
अभिनेता सलमान खान याच्या घरात मध्यरात्री युवतीने केला घुसण्याचा प्रयत्न; युवती कोण पाहा…
मुंबईः अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका युवतीने 19 मे च्या मध्यरात्री सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिचा प्रयत्न फसला आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले.
ईशा छाबरा (वय ३२) हिने 19 मे रोजी पहाटे 3.30 च्या सुमारास सलमान खान याच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर लगेचच वांद्रे पोलिस स्टेशनला कळवण्यात आले आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. ईशा छाब्रा हिला अटक करण्यात आली आहे. ईशा छाब्रा मध्यरात्री सलमान खानच्या घरात का घुसण्याचा प्रयत्न करत होती हे आता पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तिचा हेतू काय होता? ती सलमान खानची चाहती होती की यामागे आणखी काही खोलवरचे षड्यंत्र होते? हे सर्व प्रश्न आता पोलिस शोधत आहेत.
ईशा छाब्राची कसून चौकशी सुरू आहे. ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे की तिने काही दबावाखाली हे पाऊल उचलले आहे हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तिच्या कुटुंबाची आणि पार्श्वभूमीची माहिती देखील गोळा केली जात आहे. खार परिसरात राहणारी ही मुलगी म्हणत आहे की ती चुकून सलमानच्या इमारतीत आली होती. युवती खार पश्चिम परिसरातील रहिवासी आहे, म्हणजेच ती गॅलेक्सी अपार्टमेंटजवळील परिसरात राहते.
दरम्यान, ईशाच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 20 मे रोजी संध्याकाळी 7:15 वाजता, एका युवकाने देखील सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीचे नाव जितेंद्र कुमार सिंह (वय २३) आहे. जितेंद्र कुमार सिंह हा छत्तीसगडचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचाही पोलिस तपास करत आहेत. एकामागून एक घडलेल्या या घटनेमुळे सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
View this post on Instagram
अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…
अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…
सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करुन गेले वांद्रे रेल्वे स्टेशनवर; ओळख पटली…
गायक सोनू निगम याच्या विरोधात गुन्हा दाखल; काय केलं वक्तव्य पाहा…

