कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसले? दोघांना घेतले ताब्यात…

पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी असल्याच्या संशयावरुन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक जण फरार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला असून, पुढील तपास करत आहेत.

मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे. रुग्णांना बाहेर हलवण्यात येत आहे. गुरुवारी (ता. १५) 78वा स्वातंत्र्य दिन देशात साजरा होणार आहे, त्याच्या आदल्या दिवशी पुण्यात एका रुग्णालयात संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कमला नेहरू रुग्णालयात तीन संशयती आले होते. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी घुसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. सध्या रुग्णालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सोबतच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व एटीएसचे पथक देखील रुग्णालयात पोहोचले असल्याची माहिती आहे.

पुण्यातील कमला नेहरू या महापलिकेच्या रुग्णालयात सकाळी तीन दहशतवादी घुसले असल्याचा फोन पुणे पोलिसांना आला.  पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत पथक दवाखान्यात पाठवले. या दवाखान्यात तिघे बांगलादेशी नागरिक घुसले असल्याची माहिती आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. हे सर्व बिहार येथील असून ते पुण्यातील लोहिया नगर येथील रहिवाशी आहेत. या रुग्णालयात ते रक्ताची चाचणी करण्यासाठी आले होते, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडे सध्या आधार कार्ड मिळाले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. सकाळी ११ वाजता पोलिसांना एक फोन आला आणि एक संशीयत तरुण कमला नेहरू रुग्णालयात आल्याचे सांगितले गेले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच राज्य दहशवाडी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक कमला नेहरू रुग्णालयात पोहोचले आहे. त्यांच्या मार्फत देखील ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची चौकशी केली जात आहे.

ताब्यात घेतलेले पुण्यात लोहियानगर परिसरात वास्तव्याला असल्याची माहिती आहे. हे सर्व जण मूळचे बिहारचे आहेत. त्यांच्याकडे आधारकार्ड मिळाले असून पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही स्थानिकानी या तरूणांचे फोटो समाजमाध्यमांवर बांग्लादेशी म्हणून टाकून खोटा मेसेज पसरवला होता. हे तरूण कमला नेहरू रूग्णालयात गेले असता समाजमाध्यमांवर फोटो बघितलेल्या काही जणांनी याची माहिती पोलिस कंट्रोलला दिली. त्यानंतर पोलिस तिथे पोहोचले. पोलिसांच्या आता पर्यंतच्या चौकशीत ते दहशतवादी किंवा बांग्लादेशी असल्याच आढळून आलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आठ दिवसांपूर्वी एक पत्र लिहिले आहे. यात पुण्यात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडवण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. पत्रात म्हटले होते की, पुण्यातील गर्दीच्या ठिकाणी एखादी दहशतवादी संघटना बॉम्बस्फोट घडवून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणू शकते. स्वतः पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या सहीने हे पत्र लिहिलेले आहे.

पोलिस आयुक्तांकडूनच दहशतवादी कारवाई, बॉम्बस्फोट होण्याची शक्यता वर्तवली गेल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यात आता स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी कमला नेहरु रुग्णालयात संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुण्यातील आयसीस मॉड्यूलचा म्होरक्या अली याला नुकतेच दिल्लीतून अटक करण्यात आली आहे, त्यानंतर पुण्यात दहशतवादी कारवायाची धमकीची पत्र समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!