कारागृहातील नवऱ्याच्या कैदी मित्राच्या प्रेमात पडली पत्नी अन् पुढे…

नवी दिल्ली : कारागृहात पतीला भेटायला येणारी पत्नी कारागृहातील दुसऱ्याच कैद्याच्या प्रेमात पडली होती. संबंधित प्रेम कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील कारागृहात ही प्रेम कहाणी सुरू झाली होती.

अमरोहा जिल्ह्यातील एका कैद्याने पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला थांबण्याचा इशारा केला, मात्र तो पळतच राहिला. पोलिसांनी अखेर त्याच्या पायावर गोळी झाडली, त्यानंतर त्याला पकडण्यात आले. चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपीला पळून जाण्याचे कारण विचारलं असता त्याने आपली संपूर्ण कहाणी सांगितली.

कैदी वाजिद अली आपल्या पत्नीला शोधण्यासाठी निघाला होता. कारण, पत्नी त्याच्यासोबत राहणाऱ्या दुसऱ्या कैद्यासोबत पळून गेली होती. त्याने पोलिसांना सांगितले की, तो मुरादाबाद तुरुंगात असताना त्याची भेट रिझवान नावाच्या आणखी एका कैद्याशी झाली. दोघांची मैत्री झाली, या काळात वाजिदची पत्नी त्याला भेटण्यासाठी नियमितपणे कारागृहात येत असे. वाजिदने आपल्या पत्नीची त्याच्या नवीन मित्र रिजवानशी ओळख करून दिली. परंतु त्याचा मित्रच त्याचा शत्रू होईल याची त्याला कल्पना नव्हती.

वाजिदची पत्नी आणि रिजवान यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. पुढे, रिजवानची कारागृहातून सुटका झाली. सुटका झाल्यानंतर रिजवान आणि वाजिदची पत्नी भेटले आणि दोघेही तिथून पळून गेले. अनेक दिवस पत्नीची काहीच माहिती मिळत नसल्याने वाजिदने चौकशी केली. तेव्हा ती रिझवानसोबत पळून गेल्याचे समजले. यानंतर वाजिदने बदला घेण्याचे ठरवले आणि पोलिस व्हॅनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सध्या वाजिदची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्याचा ससूनमध्ये मृत्यू…

कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या…

येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर

महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!