येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!

पुणे (संदीप कद्रे): इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे यांचेमार्फत ‘परिवर्तन- प्रिझन टू प्राईड टू प्राईड’ उपक्रम येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे सुरू आहे. २६ व २७ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित अखिल भारतीय अंतरकारागृह बुध्दिबळ स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय विजेते पदाचा मान मिळवत निर्विवाद वर्चस्व गाजविले व जागतिक कारागृह ऑनलाइन बुध्दिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पटकावला.

११ ते १६ ऑक्टोंबर २०२३ दरम्यान जागतिक कारागृह ऑनलाईन बुध्दिबळ स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेत खुल्या गटात ५० देशातील एकूण ८० संघांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक फेऱ्यांमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी नोंदवित आशिया खंडातून प्रथम क्रमांक पटकावला व अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाने चुरशीच्या लढतीत एल साल्वादोर या देशाच्या ब संघाचा पराभव करत प्रथमच तृतीय जागतिक कारागृह ऑनलाईन बुध्दिबळ स्पर्धेत “सुवर्ण पदक” (गोल्ड मेडल) मिळविले.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे यांचेमार्फत “परिवर्तन- प्रिझन टू प्राईड टू प्राईड” हा उपक्रम अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, डॉ. जालिंदर सुपेकर, (भा.पो.से) विशेष पोलिस महानिरीक्षक (मुख्यालय), कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे राबविण्यात आलेला आहे. त्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पौरेशन लिमिटेड यांचेकडील डेप्युटी जनरल मॅनेजर भालचंद्र जोगळेकर, केतन खैरे-प्रशिक्षक, योगेश परदेशी समन्वयक, सागर मोहिते- सहाय्यक प्रशिक्षक, पवन काथवडे- सामना अधिकारी, गणेश माळकरी- संगणक व तांत्रिक सहाय्य, मयूर कदरेकर-समन्वयक पश्चिम विभाग यांनी कामकाज पाहिले. तसेच विजेता संघाचा ग्रॅडमास्टर अभिजित कुंटे व महिला ग्रॅडमास्टर सौम्या स्वामिनाथन यांनी अभिनंदन केले.

११ व १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी झालेल्या जागतिक बुध्दिबळ स्पर्धेत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी सुवर्ण पदक (गोल्ड मेडल) मिळविल्याबद्दल सहभागी बंद्यांचे सुनिल एन. ढमाळ, अधिक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह यांनी अभिनंदन केले. तसेच सदर स्पर्धेसाठी बंद्यांचा उत्कृष्ट सराव व यशस्वी नियोजन यासाठी डॉ. भाईदास ढोले, उपअधिक्षक, पल्लवी कदम, उपअधिक्षक, रविंद्र गायकवाड, उपअधिक्षक, मंगेश जगताप, उपअधिक्षक, आनंदा कांदे, वरिष्ट तुरुंगाधिकारी, रविंद्र्र जगताप, अति. वरिष्ट तुरुंगाधिकारी, आर. के. कानडे तुरुंगाधिकारी, व्ही. के. खराडे, सुभेदार व निलेश पाटील, कारागृह शिपाई यांनी कामकाज पाहिले.

कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…

येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…

महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!