अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…

पुणे : येरवडा खुले कारागृहाचे बंद्याद्वारा संचालित श्रृंखला उपहारगृहाचे उद्घाटन आज (बुधवार) करण्यात आले. या उपहारगृहात तयार करण्यात आलेले पदार्थ नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

कारागृह हे बंद्यांना फक्त शिक्षा भोगण्याचे ठिकाण नसून त्यांच्या मध्ये असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणे व त्यांचे समाजात योग्य ते पुनर्वसन होणे आवश्यक असते. या उद्देशाने अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा खुले कारागृहाच्या जागेवर कॉमर झोनच्या समोर बंद्याद्वारा संचालित श्रृंखला उपहागृहाचे उद्घाटन आयोजित करण्यात आलेले आहे.

उपहारगृहात तयार करण्यात आलेले पदार्थ नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. वडापाव, समोसा, पावभाजी, मिसळ, भजी, चहा, कॉफी, पुलाव, पोळी-भाजी इत्यादी पदार्थ उपलब्ध राहतील. उपहारगृहाचे बांधकाम, निर्मिती बंदी यांचे द्वारे उपहारगृहाचे बांधकाम, रंगकाम, बैठक व्यवस्था, रचना इत्यादी सर्व बंदी यांनी स्वत: तयार केलेले आहे. त्याकामी अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कोकणे, तुरुंगाधिकारी व इतर अधिकारी/कर्मचारी यांनी मेहनत घेऊन बंद्यांना प्रोत्साहन दिले. सदर उपहारगृह हे बंदी यांचे मार्फत चालविले जाणार आहे. बंदी सुधारणा पुनर्वसन या हेतूने ही उपहारगृह सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली असल्याने बंदी यांचे पुनर्वसन करण्यासाठी याचा उपयोग होणार असून या उपहारगृहाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता…

अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!

येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…

येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!