कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या थोबाडीत मारणाऱ्या पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू…

पुणे : नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जमखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते. सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जामखेडमध्ये 9 मार्च रोजी पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकाला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. आरोपी पुण्याचा रहिवासी आहे. हल्लेखोराने एकूण 7 राऊंड फायर केले, त्यापैकी 4 गोळ्या मोहळकरच्या अंगात लागल्या. या गोळीबारामुळे मोहळकर गंभीर जखमी झाला. गोळीबारानंतर जामखेड पोलिसांनी तातडीने मोहळकरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला शहरातील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हा पासून सागर मोहोळकर हा चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. गोळीबार करणाऱ्या पुणे येथील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या पूर्ण नाव माहित नाही, या आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती घेतली असून यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच या आरोपींकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. या गोळीबारामागे गुंड निलेश घायवळ याचे काही कनेक्शन आहे का याबाबत आता पोलीस तपास करत आहे.

निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार…

पुणे पोलिसांनी 9 अट्टल गुंडांना केलं तडीपार; पाहा नावे…

कर्जदारांना दिलासा! वसुलीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही…

कुख्यात गुंड निलेश घायवळ याला अखेर मोठा दणका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!