
दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…
भोपाळ (मध्य प्रदेश) : मुरैनामधल्या गोपी गावामधील दिर-वहिनीचे प्रेमसंबध होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाचा अपघाती शेवट झाला आहे. मृत्यूनंतरही चार महिने ते एकत्र असल्याचे आढळून आले आहे.
पोलिसांना एका तलावात एक कार सापडली, ती कार बाहेर काढण्यात आली तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण त्यात दोन मानवी सांगाडे होते. त्यानंतर तपास केल्यानंतर हे सांगाडे दीर आणि भावजयीचे असून, त्या दोघांचं प्रेमप्रकरण असल्याची माहिती पुढे आली आहे. दोघांनी एकत्रच आयुष्य संपवल्याचा संशय आहे; मात्र पोलिसांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. हत्या की अपघात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
मुरैनामधल्या गोपी गावातल्या कुआरी नदीत गुरुवारी एक कार बुडालेली आढळून आली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी जेसीबी आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने कार बाहेर काढली. कारचा दरवाजा उघडताच सर्वांना धक्का बसला. कारण त्यात दोन सांगाडे होते. तपासादरम्यान सांगाडे हे दीर आणि वहिनीचे असल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कारमधील मृतदेह एक महिला आणि एक पुरुषाचा आहे. गावकऱ्यांच्या चौकशीतून अनेक बाबी उघड झाल्या. त्यात हे सांगाडे दीर-भावजयीचे असल्याचे स्पष्ट झाले. नीरज सखवार हा मिथिलेशचा मानलेला दीर होता. त्यांच्यात प्रेमप्रकरण होते. फेब्रुवारीत ते अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्यात आला. पोलिसांत तक्रार देण्यात आली. तरीही त्यांचा शोध न लागल्याने ते दोघे पळून गेले असावेत, असा सर्वांचा समज झाला होता; मात्र आता त्यांचे सांगाडे सापडले. नदीचे पाणी कमी झाल्याने कार दिसली.
सांगाडे चार महिन्यांपूर्वीचे आहेत. त्या दोघांनी चार महिन्यांपूर्वी जीवन संपवलं असेल किंवा त्यांना कोणी तरी मारले असेल. आता त्याचा तपास सुरू आहे. पोलीस प्रत्येक दृष्टिकोनातून तपास करत आहेत. दोघांचे कुटुंबीय, तसंच गावकऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचे रहस्य उलगडेल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…
दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…
धक्कादायक! छोटा भाऊ, वहिनी अन् चिमुकल्याची सपासप वार करत केली हत्या….
दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…
दीर आणि वहिनी झाडाखाली थांबले-थांबले अन् पुढे…