ओळखीच्या महिलेनं वृद्धाला कारमध्ये बसवलं अन् घरी नेत केलं मोठं कांड…

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून एका वृद्ध व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत स्थानक परिसरात पीडीत 61 वर्षे व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने 8 ते 9 मार्च दरम्यान लुटण्यात आले. या घटनेची तक्रार पीडीत वृद्ध व्यक्तीने पोलिसांकडे येऊन केली. या प्रकरणाचा तपास कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड आणि कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद करत आहेत.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पीडित वृद्ध सुनील गजघाटे (वय 61) हे नागपूर येथे वास्तव्यास असून घटनेदिवशी ते काही कामानिमित्ताने कर्जत येथे आले होते. दरम्यान आरोपी महिला आदिती ढोके हिने सुनील यांना कर्जत रेल्वे स्थानकात बोलावले आणि कारमध्ये नेत वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले. मात्र या महिलेसोबत आरोपी सुशील जाधव आणि गणेश प्रधान हे साथीदारही तिच्या सोबत होते. या दोघांच्या मदतीने वृ्द्ध व्यक्ती सुनील यांचे अपहरण करण्यात आले.

अपहरण केल्यानंतर सुनील यांना दोन आरोपीतील ढोकेच्या घरी नेण्यात आले आणि तिथं त्यांना मारहाण करण्यात आली शिवाय चॉपरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपींनी सुनील यांच्याकडील सोन्याची साखळी, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 15 हजार रुपये, दोन मोबाईल असा सुमारे 2 लाख 15 हजार रुपयांचा लुट केली. आरोपी यावर थांबले नाही तर सुनील यांच्याकडून जबरदस्तीने एटीएम कार्डचा पिन नंबरही घेतला आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले. तसेच क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदीही केल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…

हृदयद्रावक! डॉ. स्तुती सोनवणे यांनी लिहिलेली सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख…

पोलिस पित्याचं ऑन ड्युटी अन् प्रशिक्षणार्थी मुलाचेही हार्ट अटॅकने निधन…

हरीशला इच्छामरणाची ‘सर्वोच्च’ परवानगी; पालकांचं अन् एम्सचंही कौतुक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!