प्रियांका बाबर! पोलिस तपासात हातखंडा असणारी दुर्गा…

(उदय आठल्ये)
इच्छाशक्ती, जिद्द ध्येयापर्यंत पोहचण्याची चिकाटी जर आपल्या अंगी असेल तर आपले ध्येय साध्य झाल्या शिवाय राहत नाही, याची आपल्याला वेळोवेळी उदाहरणे पाहायला मिळतात. याच इच्छा शक्तीच्या जोरावर सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी आपल्या यशाला गवसणी घातली आहे….

अल्प परिचय
प्रियांका बाबर यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. आई कुवर बाभळे वडील भगवान बाभळे दाम्पत्याचा पोटी प्रियांका यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

शिक्षण प्रवास
लहानपणापासून प्रियांका यांचा स्वभाव खुप खोडकर व जिद्दी होता. आपण नेहमी म्हणतो की फक्त मुलगाच आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकतो, एकदा मुलींना पण संधी देऊन बघा, त्या संधीच सोन केल्याशिवाय मुली पण माघार घेत नाही. हाच भाव मनात ठेवून त्यांचा शिक्षण प्रवास सुरू झाला. प्राथमिक शिक्षण- कन्या शाळा, बार्शी येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण -सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे झाले त्यांचे पदवीधर शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज, बार्शी, येथे झाले त्यांनी बी. ए. इतिहास विषयात केले आहे. गोल्ड मेडलिस्ट आहेत. एम. ए. इतिहास विषयात पुर्ण केले आहे‌. लहानपणापासून मैदानी खेळाची आवड असल्याने होलिबॉल, कब्बडी राज्यस्तरीय स्पर्धा मधून प्राविण्य मिळवले आहे.

वयाच्या 24 व्या वर्षी पोलिस दलात नियुक्ती..
शिक्षण पुर्ण झाल्यावर नोकरीचे वेद सर्वांनाच लागतात. परंतु, कोणता निर्णय घ्ययाचा हाच मोठा प्रश्न उभा होता. सरकारी नोकरी व त्यात पोलिस दलात जावे ही आई वडीलांची प्रामाणिक इच्छा होती. त्यासाठी प्रियांका यांनी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. कारण उच्च शिक्षण खेळाची आवड असल्याने मैदानी चाचणीसाठी काही त्रास होणार नाही. 2010 मध्ये एमपीएससी द्वारे पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. त्यामध्ये SBC कास्ट मधून महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला व ओपन मधून महाराष्ट्रात 49 रँक 530 मध्ये आल्या आहेत. 2011 मध्ये वय वर्षे 24 असताना पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली.

खाकी वर्दीतील प्रवास सुरू…
पोलिस दलातील प्रशिक्षण पुर्ण करून पोलिस उपनिरीक्षक पदावर मुंबई सारख्या शहरात 8 वर्ष कर्तव्य बजावले. कांदिवली पोलिस स्टेशन, दहिसर पोलिस स्टेशन, चारकोप पोलिस स्टेशन येथे देखील त्यांनी त्या काळात अनेक गुन्हे उघडकीस आणले व अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. सन 2019 साली पोलिस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलिस निरीक्षक पदोन्नतीने सांगली जिल्ह्यात नियुक्ती झाली.

चिवट गुन्ह्यांचा शोध घेणारी “प्रियांका”…
पदोन्नतीने सांगली जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये पहिली नियुक्ती मिळाली. मुंबई पोलिस दलातील अनुभव त्यांनी सांगली जिल्ह्यात वापरला महिलांच्या होणाऱ्या अत्याचारांबाबत त्यांनी कमालीची जागरुकता दाखवली तसेच अशा आरोपींच्या प्रति दयामाया न दाखवता, आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी नेहमी तत्परता दाखवली. प्रियांका यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला तसेच अनेक गुन्ह्यांचा तपास करून दोषारोपपत्र सादर केले होते. पोक्सो गुन्ह्यात आरोपीस 30 वर्ष शिक्षा लागली ही शिक्षा महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षा आहे.

योग्य तपासाने आज अखेर मिळालेल्या शिक्षा…
▪️ सन 2021-22 मध्ये मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असताना किचकट अश्या 3 वेगवेगळ्या पोक्सो केस मध्ये खूप खोलात जाऊन तपास केला, त्या केस मध्ये एका आरोपीला 30 वर्षाची शिक्षा मिळाली..

▪️ दुसऱ्या आरोपीला 17 वर्षाची शिक्षा मिळाली.

▪️ तिसऱ्या आरोपीला 7 वर्षाची शिक्षा मिळाली
आरोपीला शिक्षा व पिडितेला न्याय मिळाल्याची चर्चा त्या काळात जास्त झाली…

▪️ मिरज शहर पोलिस स्टेशन सन 2021 मधील पोक्सो केस मधील आरोपीला 17 सप्टेंबर 2025 रोजी 3 वर्ष सक्तमजुरी ची शिक्षा सुनावण्यात आली.

▪️ सांगली महात्मा गांधी पोलिस स्टेशन येथे सांगली येथील पोक्सो गुन्ह्यात आरोपीस 12 वर्षाची मिळाली शिक्षा.

▪️2022-23 मध्ये अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना सांगली आणि मिरज येथील लॉज, हॉटेल मध्ये चालणारे वेश्या व्यवसाय, कुंटणखाने उध्दवस्त करून अडकलेल्या महिलांची सुटका केली.

कौतुकास्पद कामगिरीने अनेकांनी केला सन्मान…
▪️ 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सांगली चे तत्कालीन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

▪️ विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र सुनिल फुलारी यांच्याकडून उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

▪️ पोलिस अधीक्षक सांगली यांच्याकडून उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…

पुस्तकाचे नावः पोलिस अधिकारी व्हायचय?
किंमत – ३०० रुपये
WhatsApp: 93712 69949

पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!

48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!

49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!