धक्कादायक! संशयावरून पत्नी आणि चिमुकल्याची झोपेतच सपासप वार करत हत्या…

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि चिमुकल्याची कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचा जीव गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

राहुल हरी म्हस्के (वय ३५) याने चारित्र्याच्या संशयावरून गाढ झोपेत असलेली पत्नी रूपाली (वय ३०) आणि मुलगा रियांश (वय ४) यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. आवाजामुळे राहुलच्या आईला जाग आली आणि त्यांनी आरडाओरड सुरू केला. यामुळे शेजारी राहणारे मदतीला आहे.

गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चिमुकल्या रियांशचाही या हल्ल्यात जीव गेला. या प्रकरणी मृत रूपालीचे वडील भास्कर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मेहकर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेला राहूल याचा विवाह रुपाली हिच्याशी झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय येऊ लागला आणि त्यांच्यात वारंवार खटके उडायला सुरुवात झाली. २९ डिसेंबरच्या उत्तर रात्री शिक्षक कॉलनी मधील रहिवासी साखर झोपेत होते. उत्तररात्री पहाटे अडीच वाजताच्या वाजताच्या सुमारास राहुलने रागाच्या भरात हातात कुऱ्हाड घेऊन पत्नी रुपाली आणि निष्पाप पुत्र रियांश यांच्या डोक्यावर सपासप वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावरच आरोपी राहुल भानावर आला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधला. मेहकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बिरांजे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आरोपी राहुलला ताब्यात घेतले. या घटनेचा तपास मेहकर पोलिस करीत आहे.

नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…

भाजप नेत्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंबावर केला गोळीबार, तिघांचा मृत्यू…

पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…

जळगावमध्ये संशयावरून चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पुत्नीची मृत्यूशी झुंज सुरू…

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!