
धक्कादायक! कोमातून बाहेर आलेल्या माथेफिरूने केली २२ सेंकदात शरीराची चाळणी…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात 40 वर्षीय व्यक्तीला भर रस्त्यात अडवून केवळ 22 सेकंदात चाकू हल्ला करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील उस्मानपुरा परिसरात मंगळवारी पहाटे पाच आज त्याची ही घटना असून या चाकू हल्ल्यात चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. घटनेतील आरोपीला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे.
अशोक दादाराव शिनगारे (वय ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृत अशोक शिनगारे यांचा मुलगा आशिष याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आशिषचे वडील मंगळवारी पहाटे पाच वाजता फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अशोक शिनगारे हे फिरत असताना त्यांच्या ओळखीचा संशयित आरोपी निखिल शिंगाडे (रा. नागसेननगर) हा त्रिभुवन चौकातून समोरून येऊन शिनगारे यांच्याजवळ येऊन बोलत होता. यावेळी प्रज्योत शिंगाडे आणि अक्षय गायकवाड हे दोघे देखील त्या ठिकाणी येऊन उभे होते. बोलता-बोलता अचानक निखिलने शिनगारे यांची कॉलर पकडत बाचाबाची सुरू केली. त्यानंतर संशयिताने त्याच्या जवळील चाकूने शिनगारे यांच्यावर हल्ला चढवला. शिनगारे यांच्या पाठीवर, मानेवर, तोंडावर सपासप वार केले. मोठा रक्तस्राव झाल्याने शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला.
शिनगारे यांच्यावरील हल्ल्याचा हा सर्व प्रकार तेथे असलेल्या एका घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अडीच मिनिटांची ही क्लिप आहे. यामध्ये शेवटच्या काही क्षणात थरारक प्रकार कैद आहे. यामध्ये निखिल सारखे चाकूचे वार करताना दिसत आहे.
दरम्यान, आरोपी निखिल याच्यावर गेल्या वर्षी नागसेननगर भागातीलच काही तरुणांनी चाकूने हल्ला केला होता. यामध्ये त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. निखिलला गंभीर जखम झाल्यामुळे तो सहा महिने कोमात होता. गेली काही महिन्यांत त्याची प्रकृती मूळ पदावर येत होती. मात्र, त्याने त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना इशारा देण्यासाठी हे निर्घृण कृत्य केल्याची शंका पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी व्यक्त केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…
प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं…
बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…
धक्कादायक! अहमदनगर जिल्ह्यात दिराने केली दोन वहिनींची हत्या…

