आश्रमाच्या नावाखाली स्वामी चैतन्यानंद करत होता अश्लीलता…

नवी दिल्ली: दिल्लीतील एका नामांकित आश्रमात सुरू असलेल्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी अश्लिल प्रकार पोलिसांसमोर उघड केला आहे.

वसंत कुंज येथील एका पॉश परिसरातील या प्रसिद्ध आश्रमात मॅनेजमेंट कोर्सची शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी संचालक चैतन्यानंदवर छेडछाडीचे आरोप लावले आहेत. श्री शृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तांचे प्रशासक पी.ए. मुरली यांच्या तक्रारीवरून स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांनुसार लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रम चालवणारा स्वामी चैतन्यानंद तात्काळ तिथून फरार झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

आश्रमात दोन तुकड्या असून, एकूण ३५ हून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १७ विद्यार्थिनींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आश्रम संचालक चैतन्यानंद सरस्वतीने त्यांच्यासोबत छेडछाड केल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संस्थेकडून मिळालेली हार्ड डिस्कही एफएसएल तपासणीसाठी पाठवली आहे. त्याचबरोबर १६ पीडित विद्यार्थिनींचे जबाब न्यायालयात (पटियाला हाऊस कोर्ट) नोंदवण्यात आले आहेत.

या प्रकरणावर दक्षिणामन्या श्री शारदा पीठम्, शृंगेरी आश्रमाने एक निवेदन जारी करून या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. “स्वामी चैतन्यानंद सरस्वती बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेला होता. पीठने त्याच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली आहे. त्याचे आचरण आणि कामे बेकायदेशीर, चुकीची आणि पीठच्या हिताविरुद्ध होती. यामुळेच त्याच्याशी पीठचे सर्व संबंध संपुष्टात आणले आहेत. स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या बेकायदेशीर कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे,” असे आश्रमाने म्हटले आहे.

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…

पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…

पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम…

भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…

भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!