Video: यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलिसांनी सांगितले…
मुंबई : नवी मुंबईतील उरण येथे यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता. नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे प्रकरणात मोठे ट्विस्ट निर्माण झाले आहे.
कर्नाटकमधून आरोपीला आज सकाळी ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याचे लोकेशन सापडत नसल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी वेळ लागला. अखेर त्याच्याच ओळखीतल्या एका व्यक्तीने दाऊद बद्दल माहिती दिली. कर्नाटकमधून त्याला ताब्यात घेतले आहे. दाऊद शेख आणि हत्या झालेल्या तरुणीमध्ये मैत्री होती. ते दोघे एकमेकांना ओळख होते. दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच्यामधून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
दाऊद आणि यशश्रीमध्ये मैत्री होती. मात्र त्यांच्यामध्ये दोन ते तीन वर्षांपासून कोणताही संपर्क नव्हता. हा किडनॅपिंगचा प्रकार नव्हता तर त्या दोघांनी एका जागी भेटायचे ठरवले, मात्र त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून हे हत्याकांड झाल्याचा अंदाज आहे. आरोपीने ठरवून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, आरोपी दाऊद शेख याला जर अटक झाली नसती तर तो केरळला पळून जाणार होता. दाऊदच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीकडून दाऊद शेख हा कर्नाटकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो कर्नाटकमधून केरळला जाणार असल्याची माहितीही पोलिसांनी मिळाली. मात्र त्यापूर्वीच मोठ्या शिताफीने पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन दाऊदच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाका Video News: ३० जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…
यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…
प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…
पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…
वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…
नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…
‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…