सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

सातारा : सातारा जिल्ह्यातील वडूथ येथे माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत शनिवारी (ता. २७) उडी घेतली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकलीचा मृतदेह सापडला असून, महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

संचिता साळुंखे (वय 22) ही महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर दोन वर्षांच्या मुलीसह कृष्णा नदीत उडी मारली आहे. महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी घेतल्याचे समजताच खळबळ उडाली. कृष्णेच्या पात्रात सध्या शोधमोहीम चालू आहे. दोन वर्षीय मुलीचा मृतदेह मिळाला आहे. पण महिला अद्याप बेपत्ता आहे. महिलेने कशामुळे पाण्यात उडी घेतली, हे समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चिमुकलीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या नदीची पाणीपातळी तब्बल 40 फुटांवर पोहोचली आहे. पाण्याच्या प्रवाहात या महिलेचा शोध घेताना अडचणी येत आहेत.

पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

धक्कादायक! MBBS युवतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या…

मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या…

Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…

नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!