पोलिसकाका Video News: ३० जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पुणे शहरात लाडकी बहीण योजनेचा बॅनर आमदाराच्या अंगलट
पुणेः पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेचे बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचाही फोटो आहे. नेत्यांच्या फोटोसह दोन महिलांचे फोटो देखील बॅनरवर लावले आहेत. संमतीशिवाय फोटो बॅनरवर लावण्यात आल्याचा आरोप या महिलांनी केला असून, थेट पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली. यानंतर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
ब्लु व्हेल गेम! दहावीतल्या मुलाने 14व्या मजल्यावरून मारली उडी
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ब्लु व्हेल गेमचं व्यसन जडले होते. व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, याचा शेवट आत्महत्येने झाला आहे. दहावीत शिकणाऱ्या या 15 वर्षीय मुलाने थेट चौदाव्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना किवळे भागात घडली आहे.
यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर
मुंबई : उरणच्या यशश्री शिंदे (वय २०) हिचा शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथमदर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा, असे दिसत आहे. आरोपीला पकडण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
उरणमध्ये पुन्हा खळबळ; एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला
मुंबई : नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे प्रकरणाने खळबळ उडाली असताना न्हावे गावातील एका युवतीच्या डोक्यात एकतर्फी प्रेमातून लोखंडी रॉड घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी प्रीतम म्हात्रेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
प्रेमविवाह! पतीच्या मृत्यूनंतर महिलेने फोडला टाहो
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्या केली. माझ्या नराधम बापाला फाशी द्या; अशी मागणी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने केली आहे.
पतीनेच जंगलात साखळीने झाडाला बांधून ठेवले
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका विदेशी महिलेला बांधून ठेवल्याच्या प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीनेच जंगलात साखळीने झाडाला बांधून ठेवलं असून गेल्या 70 दिवसांपासून आपण त्या अवस्थेत होतो असा दावा त्या महिलेने केला आहे. अद्याप नीट बोलता येत नसल्याने त्या महिलेने कागदावर लिहून हा दावा केला आहे. ललिता कायी कुमार एस असे त्या महिलेचं नाव असून या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बलात्काराच्या एक प्रकरणात न्यायालयाने घेतली कडक भूमिका
नवी दिल्ली: बलात्काराच्या एक प्रकरणात न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. कोर्टाने दिल्ली पोलिसांना संबंधित महिलेविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याबद्दल ही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. महिलांना देण्यात आलेल्या विशेषाधिकारांचा वापर वैयक्तिक शत्रुत्वात सूड घेण्यासाठीच्या शस्त्रासारखा करता कामा नये, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
उत्तर प्रदेशात नवऱ्याने पत्नीला दिली तालिबानी शिक्षा
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक व्यक्ती नोकरी निमित्त मुंबईत राहात होता. गावी आल्यानंतर पत्नी एका युवकासोबत बोलत असल्याचे समजल्यावर त्याने पत्नीला झाडाला बांधून तालिबानी शिक्षा दिली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिकमध्ये होंडा सिटी कारमधून येऊन चोरी
नाशिक : नाशिकमध्ये होंडा सिटी कारमधून येऊन वॉचमनला चाकूचा धाक दाखवून चोरी केली होती. त्यानंतर दुसरीकडे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत असताना नाशिक उपनगर पोलिसंच्या पथकाने टोळीतील पाच जणांना पाठलाग करुन पकडले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बिहारमध्ये बेपत्ता असलेल्या प्रसिद्ध मॉडेलचा मृतदेह आढळला
पाटणा : बिहारमध्ये बेपत्ता असलेल्या एका रुममध्ये प्रसिद्ध मॉडेल इशप्रीत कौर हिचा मृतदेह पंख्याला लटकलेला मिळाला. तिचा लिव्ह इन पार्टनर त्याच रुममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळावरून एक पिस्तुलही ताब्यात घेण्यात आले आहे. मॉडेलच्या वडिलांनी या युवकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मंदिरातील दान पेटीतून चोरट्यांनी रक्कम लांबवली
नाशिक: नाशिकमधील सिडकोतील महाजननगर भागात असलेल्या मंदिरातील दान पेटीतून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत दोन दानपेटीमधील सुमारे २५ हजाराच्या रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…