नाशिक पोलिसांनी कुख्यात गुंडांची भर रस्त्यावर काढली धिंड अन्…

नाशिक: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून हर्षद पाटणकर या कुख्यात गुंडाची सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शहरात जंगी मिरवणूक काढली होती. संबंधित मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर टीका केली जात होती. पण, पोलिसांनी सराईतासह त्याच्या चारचाकीचे सारथ्य करणाऱ्या चालकास बेड्या ठोकल्या असून महागडी एक्सयूव्ही कारही जप्त केली आहे. शिवाय, कुख्यात गुंडाची धिंडही काढली आहे.

कुख्यात गुंड हर्षद सुनील पाटणकर (वय 25. रा. बेथलेनगर, शरणपूर रोड) व नरेश उर्फ पवन माणिक कसबे (वय 31, रा. यशराज प्राइड, ध्रुवनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. वारंवार गुन्हेगारी कृत्यात सहभाग आढळून आल्याने शहर पोलिसांनी संशयित हर्षद पाटणकर याला तडीपार केले होते. त्यानंतरही तो गुन्हेगारी क्षेत्रात सहभागी राहिल्याने जुलै 2023 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी त्यास एमपीडीए कायद्यांतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले होते. मंगळवारी (ता. २३) स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण झाल्याने बुधवारी (ता. 24) त्याची कारागृहातून सुटका झाली होती.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

हर्षद पाटणकर याला कारमध्ये बसवून संशयित नरेश उर्फ पवन माणिक कसबे याच्यासह शहरातील गुंडांनी त्याची थाटात मिरवणूक काढली. याप्रकरणी पाटणकर व कसबे यांना अटक करण्यात आली. कर्णकर्कश हॉर्न वाजवून शेकडो दुचाकी जात असल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेत, संशयितांचा माग काढला. पोलीस मागावर असल्याचे कळताच मुख्य संशयित पसार झाले.

सरकारवाडा पोलिसांनी व्हायरल व्हिडिओनुसार संशयित पाटणकर, कसबे यांच्यासह गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तिसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळगे (सर्व रा. बेथेलनगर) यांच्यावर गुन्हा नोंदविला. त्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने संशयितांचा माग काढला. हवालदार प्रशांत मरकड आणि मिलिंदसिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांच्या ध्रुवनगर भागात मुसक्या आवळण्यात आल्या. संशयितांच्या ताब्यातून मिरवणुकीत वापरलेली कार (एमएच 15 जीएक्स 8721) हस्तगत करण्यात आली असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.

संबंधित कारवाई आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके व युनिटचे निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागूल, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, नाझीम खान पठाण, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, मिलिंदसिंग परदेशी, विशाल देवरे अंमलदार मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे व चालक समाधान पवार आदींच्या पथकाने केली आहे.

पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा…

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये म्हटले की…

नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर जीवघेणा हल्ला…

नाशिक हादरले! उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!