संतापजनक! आईने खिडकीतून बघितले अन् बसला धक्का; आरोपीला अटक…

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीमध्ये एका ४० वर्षांच्या व्यक्तीने सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला 2 एप्रिल रोजी सायंकाळी आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्त्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर, चिमुकलीच्या आईने तात्काळ एम.आय.डी.सी. भोसरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी रामु कुंजल निसाद (वय 40) याला अटक केली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64 (1), 65 (2), 74, 351 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या कलम 4, 6, 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पुणे हादरलं! महिलेने गुंगीचं औषध देऊन युवकावर केला बलात्कार…

पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…

महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!