
पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेल्या न्यु वेलकम, बेगम, दाणे आळी येथील जुना वाडा या बिल्डींगमधील काही फ्लॅट सिल केले आहेत. शिवाय, भारतात अनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी पकडले आहे.
फरासखाना पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध पोक्सो गुन्हा दाखल आहे. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत सदर दाखल गुन्ह्यामध्ये कुंटणखाना चालविणारे, तसेच जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांचा तपास करीत असतांना बिल्डींगमधील कुंटणखान्यासाठी वापरलेले फ्लॅट सिल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण 4 फ्लॅट एक वर्षाकरीता सीलबंद करण्यात आले आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांगलादेशी महिला 1) जोशना शकुर अली 2) कलसुम खातून आणि 3) अंजुरा बेगम (सर्व राहणार बांग्लादेश) मिळून आल्या आहेत. सदर महिला भारतात अनाधिकृतपणे छुप्या पद्धतीने एक महिन्यापासून वास्तव्य करीत होत्या. पोलिसांना त्याच्याकडे बांगलादेशी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती फरासखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली.
पुणे शहरात सध्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी नागरिक शोधण्याचे काम सुरू आहे. शहरातील काही भाग आहे, काही बिल्डिंग आहे, तिकडे या महिला ठेवण्यात येतात. आज चार कुंटणखाने सील केले आहेत. एजंटांकडून इकडे महिलांना आणले जाते, काही एजंटवर कारवाईचे काम सुरू आहे. वेगवेगळ्या कारणाने बांगलादेशी येत आहेत. गेल्या काही महिन्यात 40 पेक्षा जास्त बांगलादेशी पकडण्यात आले आहेत. स्थानिकांच्या मदतीने इथ येतात, त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. जे रॅकेट आहे, त्यावर कारवाई केली जात आहे, अशी माहिती झोन 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली.
पुणे! युवकाने बुधवार पेठेत जाऊन वेश्यागमन केले अन् पासवर्डच विसरला…
पुणे! बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा घरापर्यंत पाठलाग करायचे अन्…
पुणे! युवकानं PMPML बस का पळवली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती…
पुणे! बाणेर पोलिसांनी ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासत चार आरोपींना केले जेरबंद…
पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…

