पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू…

नाशिक : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वेगाने चाललेला आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारवर कोसळल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. मात्र एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात टोयोटा कंपनीच्या इटीयोस कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले, त्यामुळे एका महिलेचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने अकोले तालुक्यातील एका दोन वर्षीय चिमुकलीसह चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

ओजस्वी धारणकर (वय 2), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनील धारणकर (वय 65 वर्ष) व अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्ष, सर्व रा. अकोले) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने संगमनेरसह अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…

ट्रक आणि कारचा भीषण अपघात 6 ठार; पाहा नावे…

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!