युवतीशी चॅटींग आणि गोड बोलण्याला भुलला युवक अन् पुढे…

पुणे: एका डेटिंग साईटवर अनोळखी मुलीशी चॅटिंग करणे एका 36 वर्षीय व्यक्तीला महागात पडले आहे. मुलीने गोड बोलून या व्यक्तीला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर त्याचे 90000 रुपये लुबाडल्याची घटना सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. एक युवती आणि एका पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून फिर्यादी यांची एका युवतीसोबत ओळख झाली होती. युवतीने फिर्यादीला स्वतःचे फोटो टेलिग्राम वर पाठवले आणि तुला भेटायचे आहे असे सांगितले. युवतीच्या प्रतिसादानंतर फिर्यादीने न-हे परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तिला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेला. काही वेळ युवतीने फिर्यादी सोबत गप्पा मारल्या. त्यानंतर तिने फिर्यादीला बारा हजार रुपये स्वतःच्या अकाउंट वर ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादी काही वेळात पैसे ट्रान्सफर पण केले. त्यानंतर तिने आणखी 38 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. पण, फिर्यादीने पैसे ट्रान्सफर करण्यास नकार दिला.

युवतीने यानंतर हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या एका व्यक्तीला आतमध्ये बोलावले. त्या व्यक्तीने आत आल्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करत जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. शिवाय, दोघांनी फिर्यादीला मारहाण करत त्यांच्या हातातील अंगठी काढून घेतली. एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन या दोघांनीही त्या ठिकाणाहून धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात एका टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरताना स्फोट…

पुणे शहरात मध्यरात्री खुनाचा थरार, घरात घुसून झाडल्या गोळ्या अन्…

युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…

सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!