पाकिस्तानात मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा…

लाहोर: पाकिस्तानमध्ये एका धार्मिक शाळेतील शिक्षकाला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराला अल्पवयीन भावांचे लैंगिक शोषण आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पंजाब प्रांतातल्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव तन्वीर अहमद असे आहे तर त्याच्या साथीदाराचे नाव नौमन असे आहे. लाहोरपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओकारा शहरामध्ये या दोघांनी 2021 च्या फेब्रुवारीमध्ये 6 वर्षे आणि 10 वर्षे वयाच्या दोन भावांचे लैंगिक शोषण केले होते.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सय्यदा शहजादी नजफ यांनी अहमदला फाशीची शिक्षा सुनावली तर नौमनला त्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या दोघांना 10 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. दोघांनी आपला गुन्हा कबूल केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!