पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…
गोंदिया: कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गोंदियामध्ये घडली आहे. गोंदियाच्या नवेगावबांध पोलिस स्टेशन हद्दीतील धाबेपवनी AOP मध्ये ही घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कर्माचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षल गतीविधीवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात AOP बांधण्यात आल्या […]
अधिक वाचा...शर्टच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू…
गोंदिया: शर्टच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिक्षकाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरेश संग्रामे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. नत्थु गायकवाड असे जखमी असलेल्या व्यक्तीचं नाव आहे. गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात ही घटना घडली […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…
गोंदियाः गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सुर्यवंशी तीन महिन्यांपूर्वी पोलिसांत भरती झाली होती. स्मिता सुर्यवंशी यांच्या कुटुंबात आनंदाने गहिवरले होते. मात्र, सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आनंद फार काळ टिकला नाही. गोंदिया येथे झालेल्या शिवशाहीच्या बस अपघातात महिला पोलिस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोंदियाच्या कोहमारा गोंदिया मार्गावर डव्वा-खजरी गावाजवळ शुक्रवारी (ता. २९) […]
अधिक वाचा...गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात! ११ जणांचा जागीच मृत्यू…
गोंदिया : शिवशाही बस उलटून ११ जण ठार झाले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ अपघाताची घटना घडली आहे. अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपघातग्रस्तांना तातडीने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...संतापजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्…
गोंदिया : एका शिक्षकाने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवून लज्जास्पद कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीविरोधात तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या शिक्षकाचं निलंबन देखील करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने आपल्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. […]
अधिक वाचा...पोलिसांच्या गाडीला ट्रकने दिली धडक; पोलिसकाकाचा मृत्यू…
गोंदिया : राष्ट्रीय महामार्गावरील मासूलकसा घाटावर पोलिसांच्या वाहनाला ट्रकने जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शिवाय, दोन जण जखमी झाले आहेत. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्गावर देवरी मासुलकसा घाट येथे लोखंडी सळया घेवून जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने वाहतूक […]
अधिक वाचा...गोंदियामध्ये मृत पोलिसकाकाच्या कुटुंबियांना धनादेशाचे वाटप…
गोंदिया: अपघात व दीर्घ आजाराने निधन झालेले पोलिस अंमलदार यांचे कुटुंबीय यांना पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांचे हस्ते 10 लक्ष रुपयांचे “प्रतिकात्मक धनादेशाचे” वाटप करण्यात आले. पोहवा/1025 रविंद्र हेमराज पारधी, नेमणुक पो.स्टे. नवेगावबांध यांचा दिनांक 14/05/2022 रोजी सायंकाळी पो.स्टे. गोंदिया ग्रामीण हद्यीत अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर 05/12/2022 रोजी […]
अधिक वाचा...माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार…
गोंदिया: माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर आज (गुरुवार) भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. हल्ल्यातील मारेकऱ्यांची ओळख पटली नसून मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे. लोकेश उर्फ कल्लू यादव हे माजी नगरसेवक असून ते अनेक सामाजिक कार्यात सक्रीय आहे. […]
अधिक वाचा...बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून चाकूने सपासप वार करून हत्या…
गोंदिया : आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कुडवा येथे मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी आरोपी भावासह त्याच्या एक साथीदाराला पोलिसांनी अटक करण्यात केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत. गोंदिया शहरापासून जवळच असलेल्या कुडवा येथील गोंडीटोला रोड चौक परिसरामध्ये रविवारी (ता. 26) मध्यरात्री घडली आहे. […]
अधिक वाचा...भावाच्या सुनेची कुऱ्हाडीने वार करुन हत्या तर वहिनीचा कापला कान…
गोंदिया : एकाने किरकोळ वादातून आपल्या भावाच्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आणि वहिनीचा कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गोंदिया तालुक्यातील दवणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवरी या गावात प्रीतम ठाकरे याने आपल्या भावाच्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने हत्या केली आहे. ठाकरे परिवार […]
अधिक वाचा...