कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…

कोल्हापूर : जवानाची पत्नी आणि तिच्या प्रियकराने जवानाचे हात पाय बांधन विष पाजले होते. विष पाजण्यात आलेल्या जवानाचा अखेर मृत्यू झाला आहे. जवानाच्या मृत्यूनंतर आता पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या जवानाचे नाव अमर देसाई असे असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

जवान अमर देसाई यांच्यावर 18 जुलै रोजी झोपेत असताना विषप्रयोग झाला होता. झोपत असतानाच त्यांचे हात-पाय बांधण्यात आले होते. विषप्रयोगाची ही घटना समजताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांचे प्राण वाचवण्याचा डॉक्टरांनी अटोकाट प्रयत्न केला. पण ते औषधांना प्रतिसाद देत नव्हते. उपचार चालू असताना 15 दिवसांनी त्यांची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेनंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकाराला सोबत घेऊन जवान अमर देसाई यांना विष पाजले होते.

लष्करातील जवानाचे हातपाय बांधून पत्नीने केला विषप्रयोग…

दरम्यान, जवान अमर देसाई यांच्यावर त्यांच्याच पत्नीने विषप्रयोग केला. या घटनेची माहिती शेजारच्यांना समजली. त्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला आणि त्यांना थेट रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर पुण्याच्या रुग्णालयात उपचार चालू होते. पण त्यांचा अखेर मृत्यू झाला. या घटेनंतर विषप्रयोग करणाऱ्या पत्नीच्या साथीदारांचा शोध चालू करण्यात आला होता. अमर देसाई हे लष्करात जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्…

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…

प्रेम, लग्न आणि पत्नीचे उच्च शिक्षण; पत्नी म्हणते कोण तो? ओळखत नाही…

हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!