Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…

लखनौ (उत्तर प्रदेश): लखीमपूर येथील आठवी पास असलेल्या राजन वर्मा याने पोलिसाच्या वर्दीत फोटो दाखवत दहा महिला पोलिसांशी शारिरीक संबंध ठेवले. शिवाय, त्याने या दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तब्बल दोन कोटी रुपयांना फसवले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

बरेली पोलिसांनी राजन वर्मा याला अटक केली. या अटकेनंतर त्याने या दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तब्बल दोन कोटी रुपयांना फसवले असल्याचे पुढे आले आहे. पोलिस अधीक्षक राहुल भाटी यांनी याची माहिती दिल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. बरेलीच्या कोतवाली पोलिसांनी एका बसस्थानकावर राजन वर्मा याला अटक केली आणि त्याचे कारनामे पुढे आले.

लखनौच्या पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयात तैनात असल्याची माहिती देत या राजन वर्मा ने एका पाठोपाठ एक महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याशी प्रेमाची नाटकं केली. त्यासाठी त्यांनी पोलिसांच्या ऑफिशियल संकेतस्थळावरून महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या तारखा आणि त्यांची माहिती तो काढत होता. त्यावरून संबंधित महिला पोलिस कर्मचारी कोठे नियुक्तीला आहे, याची माहिती काढून, तो पोलिसाच्या वेशातील आपला फोटो पाठवून लग्नाचे आमिष दाखवत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता.

एकापाठोपाठ एक दहा महिला पोलिस कर्मचारी त्याच्या खोट्या प्रेमात अडकल्या. त्याने तब्बल दोन कोटी रुपयांची केली आहे. फक्त आठवी पास असूनही त्याने पोलिसांनाच फसवण्याचे काम केले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात एक बाब पुढे आली, लखीमपूर मध्ये राहणाऱ्या एका स्पेशल सिक्युरिटी फोर्स मधील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून त्याने पोलिसांचे वागणे, पोलिसांचे सुरक्षाविषयक वर्तन या साऱ्या लखबी त्याने शिकून घेतल्या आणि पोलिसांशी संबंधित सर्व माहिती पण त्याने करून घेतली. त्यानंतर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. मात्र जेव्हा तिला त्याची हकीकत समजली, तेव्हा मात्र तिने त्याच्याशी घटस्फोट घेतला. त्यानंतर मात्र त्याने एका पाठोपाठ एक असे करत तब्बल दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले. शिवाय, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले व त्यांच्याकडून पैसेही उकळले.

पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…

नवरा तिसरं लग्न करत असतानाच दोघी मंडपात पोहोचल्या अन्…

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!