पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…

पुणे : पुणे शहरात गेल्या आठवड्यात दोन दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. दहशतवाद विरोधी पथकाने एका आरोपीला गोंदियातून अटक केली आहे. त्याने पुण्यात याआधी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी गोंदियात सोय केली होती. आता या प्रकरणी आणखी सहा जणांचा शोध घेतला जात आहे.

पुण्यात स्फोट करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली होती. दोन्ही दहशतवाद्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती एटीएसला समजली होती.

दरम्यान, कोथरूड पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४) यांना गाडी चोरताना अटक केली होती. दोघांकडे अधिक तपास केल्यांवर हे दोघे वॉंटेड दहशतवादी असल्याच तपासात समोर आले होते. दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक लॅपटॅाप चार फोन एक टॅब्लेट काही पेनड्राईव्ह तपासात जप्त करण्यात आले होते. कोथरूड पोलिसांकडून हा तपास एटीएसला वर्ग केल्यानंतर या तपासात काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एटीएस ने तब्बल ४२९ पानांचा अहवाल कोठडी वाढवून मागताना न्यायालयात सादर केला आहे.

पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!