गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल एकूण 24 गोवंशीय जनावरे/बैल, दोन आयशर ट्रक असा एकूण 24,80,000 रुपयांचा मुददेमाल गंगाझरी जप्त केला आहे.
गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या धदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील सर्व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते. निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी, तिरोडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे गंगाझरी पोलिसांची अवैधरीत्या चालणाऱ्या धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.
दिनांक 07/08/2023 रोजी पोलिस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे यांना रात्री 08.00 वा. मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे पो. स्टे. गंगाझरी येथील पोलिसांनी लेंडेझरी फाटा, चुटिया पांगडी रोड, मौजा पांगडी, ता.जि. गोंदिया येथे नाकाबंदी लावली. रात्री 21.30 वा. च्या सुमारास मौजा शहरवाणीकडून येणारे आयशर ट्रक क्र. एम एच 36 एफ 3533 व आयशर ट्रक क्र. एम एच 35 ए जे 1664 ही दोन गेरुवा रंगाची संशयित वाहने पोलिसांनी थांबवून त्या ट्रकच्या मागील डाल्याची पाहणी केली. पहिल्या आयशर ट्रक मध्ये एकूण 13 गोवंशीय जनावरे/बैल व दुसऱ्या आयशर ट्रक मध्ये एकूण 11 गोवंशीय जनावरे/बैल असे दोन्ही ट्रकमध्ये मिळून 24 जनावरे/बैल एकूण किंमत 4,80,000/- रू. अवैधरीत्या कत्तलीकरीता निर्दयतेने, चाऱ्या पाण्याविना कोंबून बंदिस्त करून वाहतूक करताना आढळून आली.
दोन्ही ट्रकच्या चालकाकडे त्याबाबत कोणताही परवाना नसल्याने जनावरासहीत ते दोन्ही ट्रक (किंमत 20,00,000/-) असा एकूण 24,80,000/- रु. किमतीचा माल ताब्यात घेण्यात आला.24 गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता कोरणी येथील गौशाळेत दाखल करण्यात आलेली आहेत.
सदर प्रकरणी आरोपी नावे पुढीलप्रमाणे –
1) इमरान उर्फ सोहेल रियाज खान, वय 27 वर्ष,रा. चंगेरा, ता.जि. गोंदिया
2) वसीम रफिक खान, वय 31 वर्ष, रा. चंगेरा, ता.जि. गोंदिया
3) प्रकाश उर्फ छोटू रतीराम कोंबडे, वय 24 वर्ष, करा डांगुर्ली ता.जि. गोंदिया.
4) ठाणेश चंदन देशकर, वय 30 वर्ष, रा. चंगेरा, ता.जि. गोंदिया.
5) उमेश उर्फ बंडू सयसराम राहंडाले, वय 32 वर्ष, रा. शहारवाणी, ता गोरेगाव, जि. गोंदिया.
6) इमरान रेहमान शेख, वय 30 वर्षे, ता.जि. गोंदिया
आरोपींविरुध्द पोलिस ठाणे गंगाझरी येथे अप.क्र. 279/2023 कलम 11 (1),(ड) (इ) प्रा.छ. प्रति. अधि. सह कलम 5, 6, 9 महा. पशु संवर्धन अधि. 1967 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलिस स्टेशन गंगाझरी येथील पोलिस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी, तिरोडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे, पो.उप.नि. पराग उल्लेवार, स.फौ. मनोहर अंबुले, पो.हवा. रामेश्वर बर्वे, चा.पो.हवा. तुळशीदास पारधी, पो.ना. महेंद्र कटरे, पो.शि. हरिकिशन भेलावे, संतोष लांजेवार, राजेश राऊत, रेखलाल पारधी, संदीप बारई, श्रीकांत नागपुरे, यांनी केली आहे.
पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…
बकऱ्यांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…
लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…