NEET मधील अपयश! मुलाच्या आत्मत्येनंतर वडिलांनी घेतला जगाचा निरोप…

चेन्नईः मेडिकलच्या नीट परीक्षेत अपयश आल्यामुळे एका मुलाने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाच्या वडिलांनी गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने सेल्वसेकर यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

चेन्नईमधील जगदिश्वरन हा विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट (NEET) परीक्षेत नापास झाला होता. जगदिश्वरनने 2022 मध्ये 427 गुणांसह बारावी पास झाला. मात्र, जगदीश्‍वरनला दोन प्रयत्नांत नीट परीक्षेत नापास झाला होता. घरात त्याचा मृतदेह आढळला होता. मुलाच्या आत्महत्येनंतर वडील सेल्वसेकर हे सुद्धा दुसर्या दिवशी सकाळी मृतावस्थेत आढळले.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांनी आवाहन केले आहे की, ‘विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नका, स्वत:वर विश्वास ठेवा आणि आयुष्य जगा. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे वाढतं प्रमाण पाहता, सरकार नीट परीक्षा वगळ्याच्या प्रयत्नात आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. अशा परिस्थितीत आत्महत्येचा विचार मनात आणू नका. विद्यार्थ्याच्या मार्गातील अडथळा ठरणारी नीट परीक्षा लवकरच वगळण्यात येईल. तामिळनाडू सरकार यासाठी प्रयत्नशील आहे.’

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

धक्कादायक! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…

बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!