बकऱ्यांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…

गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): बकऱ्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दिनांक 12/07/2023 रोजी चे 02/15 वा. चे सुमारास पो.स्टे. गंगाझरी हद्दीतील टिकायतपूर किंडगीपार गावातील रामेश्वर बिसेन याचे घरासमोरील गोठ्यात बाधलेल्या 07 लहान मोठ्या बकऱ्या व टिकायतपूर येथील अनमोल लिल्हारे यांचे घराजवळील गोठ्यातून 09 लहान मोठ्या बकच्या अशा 16 बकऱ्या अंदा. किमंती 68,000/- रु च्या कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याने तक्रारी वरून पो. ठाणे गंगाझरी येथे 1) अप क्र. 234/2023 कलम 380, 461 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दिनांक 13/07/2023 रोजी पो. ठाणे. दवनिवाडा हद्दीतील तक्रारदार विजय उईके (रा. सालाईटोला) यांच्या घरासमोरील गोठ्यातून 04 बकऱ्या किमंती 16000/- रु च्या अज्ञात चोरांनी चोरून नेल्याने तक्रारी वरून पो. ठाणे दवनिवाडा येथे 1) अप क्र. 184/2023 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. दिनांक 07/07/2023 रोजी पो.ठाणे आमगाव हद्दीतील माणेगाव ठाणा येथे तक्रारदार लोकचंद मरसकोल्हे (रा. मानेगाव ठाणा) यांचे ठिनाच्या शेडचे कुलूप तोडून शेड मधील 12 नग बकऱ्या किमती 71,000/- रु च्या अज्ञात चोराने चोरुन नेल्याने तक्रारी वरून पो. ठाणे आमगाव येथे – 1) अप क्र. 222/ 2023 कलम 380,461 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

बकरी चोरीचे लागोपाठ तीन गुन्हे दाखल झाल्याने सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी नमूद तिन्ही गुन्ह्याचा समांतर तपास करून सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणणेबाबत व गुन्हेगारांना जेरबंद करण्याबाबत पो.नि.स्था. गु.शा गोंदीया यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचनेप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक बकऱ्या चोरीच्या समांतर तपास आणि गुन्हेगारांच्या शोधाकरिता रवाना करण्यात आले होते. पोलिस पथक घटनास्थळाला भेट देऊन अज्ञात आरोपीतांचा शोध करीत असताना गुप्त बातमीदार कडून माहिती प्राप्त झाली की, काही दिवसापूर्वी डेरेवाले राहत होते त्यांनीच बकरी चोरी केली असावी असा संशय व्यक्त करून ते मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील राहणारे होते अशी माहिती मिळाली. प्राप्त माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेतल असता दिनांक 22/07/2023 रोजी संशयित 1) युनुस ऊर्फ साबीन आर्यन खान (वय 22 वर्षे, रा.ठी. बडेगाव, मरारटोला, तहसील/पो.ठा. देवेन्द्र नगर, जि. पन्ना राज्य मध्य प्रदेश सध्या रा. गोरतारा,सोहगपुर,जिल्हा शेहडोल, राज्य मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. त्यास बकऱ्या चोरीच्या संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी त्याचे साथीदार फरार आरोपी
1) गोलू ऊर्फ अमिर मुबारक हुसैन वय 35 वर्ष
2 ) जावेद मुबारक हुसेन वय 35 वर्ष
3) राजा शफीक शेख (वय 22 वर्ष तिघे रा. बापूनगर, ओडीया मोहल्ला, खुर्षीपार, दुर्ग, छ.गं.) यांचे सोबत मिळून बकऱ्या चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार सदर संबंधात अधिकचा तपास करत फरार अरोपीतांचे शोधकार्य करीता पथक रवाना होवून आरोपीतांचा शोध घेण्यात आला. फरार तिन्ही आरोपी यांना खुर्षीपार, दुर्ग, छत्तीसगड येथून ताब्यात घेतले. गुन्ह्या संबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी वरील तिन्ही गुन्हयाची कबुली दिली त्याचप्रमाणे भंडारा जिल्हयातील लाखनी, साकोली येथे सुध्दा बकऱ्या चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल करून विक्री केल्याचे तसेच पैसे आपसात वाटून घेतल्याचे सांगीतले.

आरोपींच्या ताब्यातून बकऱ्या चोरीच्या गुन्ह्यातील त्यांना बकऱ्या विक्रीतील प्राप्त रूपये मुद्देमाल 1) नगदी 39 हजार 500/- रूपये.
2) एक इको चारचाकी गाडी क्रं.CG- 07 BZ- 5242 किंमती अंदाजे 3 लाख 50,000/- रूपये असा एकूण 3 लाख 89 हजार 500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी क्रं. 1) युनुस ऊर्फ साबीन आर्यन खान (वय 22 वर्षे, रा.ठी. बडेगाव, मरारटोला, तहसील/पो.ठा. देवेन्द्र नगर, जि. पन्ना राज्य मध्य प्रदेश) यास दिनांक 22/07/2023 रोजी पो. ठाणे गंगाझरी अप. क्र. 234 /2023 कलम 380, 461, भादवि गुन्ह्यात ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. तसेच फरार आरोपी क्रं. 2 ते 4 2) गोलू ऊर्फ अमिर मुबारक हुसैन वय 35 वर्ष, 3 ) जावेद मुबारक हुसैन वय 35 वर्ष, 4) राजा शफीक शेख वय 22 वर्ष रा. बापूनगर, ओडीया मोहल्ला, खुर्शीपार, दुर्ग, छत्तीसगड यांना दिनांक 01/08/ 2023 रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. वरील नमूद सर्व आरोपी हे आंतरराज्य बकऱ्या चोरी करणारी टोळी असून यांनी अश्याच प्रकारे आणखी गुन्हे केल्याची शक्यता आहे.

वरील नमूद प्रमाणे 1 ते 4 आंतरराज्यिय टोळी तील आरोपीतांना पुढील कार्यवाही होणेस्तव पो. ठाणे गंगाझरी दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्यांचा अधिकचा तपास गंगाझरी पोलिस करीत आहेत. सदरची उत्कृष्ठ कामगिरी निखील पिंगळे, पोलिस अधिक्षक, गोदिया, अशोक बनकर, अपर पोलिस अधिक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु. शा.चे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा पथकातील स.पो.नि. विजय शिंदे, पो. उप.नि. महेश विघ्ने, पो.हवा. तुलसीदास लुटे, दिक्षित दमाहे, धनंजय शेंडे, पो. शि. संतोष केदार, अजय रहांगडाले,चापोशि विनोद गौतम, कुंभलवार यांनी केलेली आहे.

लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!