IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…

अहमदाबाद (गुजरात) : एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घराच्या दारातच विष प्राशन केले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे एका गुंडासोबत प्रेमसंबध होते. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासोबत पळून गेली होती. एका मुलाच्या अपहरण प्रकरणातही ती सहभागी होती. संबधित महिलेने गांधीनगर येथील घराच्या दारात उभं राहून विष प्राशन केले. त्यानंतर तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सूर्या जे (वय ४५, रा. तमिळनाडू) असे या महिलेचे नाव आहे

सूर्या शनिवारी सकाळी पती रणजीत कुमार जे यांच्या घरी पोहोचली होती. मात्र संतापलेल्या पतीने घरातील कर्मचाऱ्यांना तिला घरात येऊ देऊ नका, असे सांगितले. रणजीत कुमार पत्नी सूर्यासोबत घटस्फोटासाठी बाहेर गेले होते. पत्नीला कोणत्याही परिस्थितीत घरात येऊ देऊ नका, असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते. सूर्या त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा कर्मचाऱ्यांनी आत येण्यास नकार दिला. सूर्याने खूप प्रयत्न केले पण आत जाता आले नाही, त्यानंतर रागाच्या भरात सूर्याने घराच्या दारात विष प्राशन केले.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

दरम्यान, 14 वर्षांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक टाळण्यासाठी सूर्या तिच्या पतीच्या घरी गेली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. सूर्याचं नाव तिच्या कथित गँगस्टर बॉयफ्रेंड ‘हायकोर्ट महाराजा’सोबत अपहरण प्रकरणात पुढे आले होते. मुलाच्या आईसोबत पैशांवरून काही वाद झाल्याने त्यांनी 11 जुलै रोजी मुलाचे अपहरण केले होते. या कामात त्यांचे सहकारी सेंथिल कुमार यांनीही त्यांना साथ दिली. त्यांनी त्याच्या आईकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, परंतु मदुराई पोलिसांना मुलाची सुटका करण्यात यश आले होते. पोलिसांनी सूर्यासह सर्व सहभागींचा शोध सुरू केला. सुमारे 9 महिन्यांपूर्वी सूर्या आपल्या पतीला सोडून ‘हायकोर्ट महाराजा’सोबत पळून गेली होती.

आयएएस पत्नी सूर्याने नऊ महिन्यांपूर्वी पतीला सोडले होते आणि ती गँगस्टरसोबत रिलेशनशीपमध्ये होते. गेल्या आठ महिन्यांपासून ती गुजरातमध्ये नव्हती. आयएएस अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगितले होते. विषप्राशण करण्यापूर्वी सूर्याने एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये तिने तामिळनाडूत तिच्यासोबत झालेल्या दगाबाजीबाबत लिहिले होते. तिला आयुष्याची नवी सुरुवात करायची होती, पण तिचे पैसे कुठेतरी फसले होते, जे परत येण्याची शक्यता नव्हती. ती तिच्या आयएएस पतीकडेही परत जाऊ शकत नव्हती. सूर्याने सुसाइड नोटमध्ये आपल्या पतीवर कुठलाही आरोप केलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ आयएएस रंजित कुमार २००५ च्या बॅचचे अधिकारी आहेत.आयएएस रंजित कुमार हे गुजरातच्या विद्युत नियामक आयोग (GERC) येथे सचिव पदावर कार्यरत आहेत. या पती-पत्नीमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून वाद सुरु होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

महिला ips अधिकाऱ्याचा पाठलाग करत राहिला अन् जाळ्यात सापडला…

धक्कादायक! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!