
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…
लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेश पोलिस दलात तैणात असणाऱ्या महिला पोलिस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकुर यांची एकाने फसवणूक केली आहे. श्रेष्ठा ठाकुर यांनी गाजियाबादच्या कौशांबी स्थानकात पूर्वाश्रमीचा पतीविरोधात तक्रार दाखल केली. शिवाय, लग्नानंतर त्याची खरी माहिती उघड झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.
कानपूरच्या रहिवासी असलेल्या श्रेष्ठा ठाकुर या सध्या उत्तर प्रदेश पोलिसात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्या 2012 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सध्या त्या शामली येथे कार्यरत आहेत. उपअधीक्षक यांना उत्तर प्रदेशमध्ये लेडी सिंघम या नावाने ओळखले जाते. गाजियाबादच्या कौशांबी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, 2018 मध्ये त्यांचे लग्न रोहित राज नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. श्रेष्ठा ठाकुर आणि रोहित यांची ओळख मेट्रोमोनियल साईटवरुन झाली होती. रोहितने स्व:ला 2008 बॅचचा आयआरएस अधिकारी असल्याचे सांगितले होते. रांची येथे कार्यकरत असल्याचे त्याने सांगितले होते. श्रेष्ठा ठाकुरच्या कुटुंबियांनी रोहित आणि कुटुंबिंयाबद्दल चौकशीही केली होती.
श्रेष्ठा ठाकुरच्या कुटुंबियांनी रोहित आणि त्याच्या कुटुंबिंयाबद्दल चौकशी केली होती. 2008 मध्ये रोहित राज नावाचा व्यक्ती खरेच आयआरएससाठी सिलेक्ट झाला होता. तो रांची येथे कार्यरत आहे. दोघांच्या माहितीमध्ये साम्य आढळल्यामुळे श्रेष्ठा ठाकुरच्या कुटुंबियांचा गैरसमज झाला. त्यामधून रोहित याने श्रेष्ठा ठाकुरची फसवणूक केली. आरोपी रोहितने 2008 बॅचच्या अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करत श्रेष्ठा ठाकुर यांची फसवणूक केली.
लग्न झाल्यानंतर श्रेष्ठा ठाकुर यांना आपली फसणूक झाल्याचे समोर आले. आपला पती आयआरएस अधिकारी नाही, त्याने फसवणूक करुन लग्न केल्याचे समजल्यानंतर श्रेष्ठा ठाकुर यांना मोठा धक्का बसला. पुढे त्याने श्रेष्ठा ठाकुर यांच्या नावाचा वापर करत अनेकांना फसवले. अनेकांकडून पैसे लुबाडले. त्यामुळे त्रासलेल्या श्रेष्ठा ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. श्रेष्ठा ठाकुर यांनी घटस्फोट घेतला, सध्या रोहित विरोधात पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, श्रेष्ठा ठाकुर यांची लहानपणी गुंडाकडून त्यांची छेडछाड करण्यात आली होती.कॉलेजमध्येही त्यांनी असे अनुभव पाहिल्यामुळे आपण आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगत त्यांनी ते पूर्णही केले. सन २०१२ साली युपीएससी परीक्षा पास होऊन त्या डीएसपी बनल्या. नोकरीच्या ६ वर्षानंतर श्रेष्ठा ठाकूर यांनी आयआरएस अधिकारी समजून रोहित राज यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र, रोहितच्या वागण्यातून त्याचा पर्दाफाश झाला अन् सत्य समोर आले. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला आहे.
आयपीएस वडिलांचा आदर्श! वकिली सोडून ईशा सिंह बनल्या आयपीएस…
तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस…
जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

