धक्कादायक! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

चेन्नई : तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं आहे.

विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले होते. शिवाय, या वर्षी, विजयकुमार यांनी कोईम्बतूर रेंजचे नवीन पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून पदभार स्वीकारला होता. याआधी त्यांची शेवटची पोस्टिंग चेन्नई येथे होती, जिथे त्यांनी पोलिस उपायुक्त म्हणून काम केले. आता ज्या कोइम्बतूर रेंजमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामध्ये कोईम्बतूर ग्रामीण, तिरुपूर ग्रामीण, निलगिरी आणि इरोड जिल्ह्यांचा समावेश आहे.

विजयकुमार आज (शुक्रवार) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले आणि 6.45 च्या सुमारास त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये आले. त्यांनी त्याच्या सुरक्षा अधिकाऱ्याला (पीएसओ) आपले पिस्तूल देण्यास सांगितले. हे पिस्तून घेऊन ते कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी 6.50 च्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

दरम्यान, विजयकुमार यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, काही आठवड्यांपासून ते व्यवस्थित झोपू शकले नाहीत. ते प्रचंड नैराश्यात होते. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!