TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…

इंदोर (मध्य प्रदेश): TCS कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर असणाऱ्या सुरभी जैन हिने दोन दिवसांपूर्वी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने काही खुलासे केले आहेत.

सुरक्षा रक्षकाने सांगितले, ‘सुरभी आत्महत्या करण्यापूर्वी दोन तास फिरत होती. या दरम्यान ती माझ्या सोबत बोलली. सुरभीला पाहून अजिबात असे वाटलं नाही की, ती टेन्शनमध्ये आहे. ती माझ्याशी चांगलं हसून बोलली. पण, काहीवेळानंतर तिने आत्महत्या केल्याचे समजले. मला स्वत:ला धक्का बसला आहे. जी मुलगी काही वेळापूर्वी माझ्याशी हसून बोलली. तिने थोड्याचवेळात जीवन संपवले.’

सुरभी सोसायटीत फिरत असताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिवाय, सुरक्षा रक्षकासोबत बोलताना दिसत आहे. सुरक्षा रक्षकाने सांगितले, सुरभी आली, तेव्हा मीच ड्युटीवर होतो. याआधी तिला कधी इथे पाहिलं नव्हते. ती इथे बी ब्लॉकमधील फ्लॅट नंबर 704 पाहायला आली आहे. ब्रोकर येईल तेव्हा जाईन. तिला एंट्री करायला सांगितली, तेव्हा तिने ब्रोकर आल्यावर करेन असे सांगितले. मी तिला सांगितलं की, एंट्री केल्याशिवाय वरती जायला मनाई आहे. त्यावर ती म्हणाली की, मी वरती जाणार नाही. खालीच फिरतेय. 24 जूनच्या दुपारी 12.30 मिनिटांनी ती आली होती. दुपारी 2.30 वाजेपर्यंत एकटीच खाली फिरत होती. तो पर्यंत ब्रोकर आला नव्हता. आधी ती ए ब्लॉकमध्ये गेली नंतर बी ब्लॉकमध्ये. दोन्ही ठिकाणी गार्ड होते. त्यानंतर ती सी ब्लॉकमध्ये गेली. तिथे गार्ड नव्हता. पावणे तीनच्या सुमारास ती इथून लिफ्टने वर गेली. त्यानंतर काय झालं मला माहित नाही. मी मागच्या बाजूला ड्युटीवर होतो. वरती गेल्यानंतर तिने तिथून उडी मारली. झाडलोट करणाऱ्या बाईने या घटनेबद्दल माहिती दिली.’

सुरभीच्या वडिलांनी सांगितले, ‘तिचे 9 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण काही काळाने तिचा घटस्फोट झाला. काही काळापासून ती डिप्रेशनमध्ये होती. अहमदाबादमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. मृत्यूआधी तिने I am Sorry pappa म्हणून तिने मला मेसेज केला. त्यानंतर आम्हाला समजलं की सुरभीने जीवन संपवले.’

पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!