जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू…

मुंबई : जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास RPF कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह या आरपीएफ कॉन्स्टेबला ताब्यात घेतले आहे.

जयपूर एक्स्प्रेस ट्रेन राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. गोळीबारात चार जण जागीच ठार झाले असून, काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलिस आणि आरपीएफ पोलिस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

राजस्थान ते मुंबई सेंट्रल या जयपूर एक्स्प्रेसमधील B-5 डब्यात अचानक गोळीबार झाल्यानंतर गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आरपीएफ हवालदार चेतन सिंहचा ट्रेनच्या डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंह याने प्रवाशांच्या दिशेने बंदूक उगारली. मात्र सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा आणि शांत राहण्यास सांगितले. परंतु रागात असलेला चेतन सिंह याने आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह तीन प्रवाशांवर त्याने गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!