बदला! 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ…
गडचिरोली : छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या सीमा भागात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 3 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ निवडत आपल्या साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेऊन तीन माओवाद्यांना ठार केले आहे. 6 एप्रिल 2010 रोजी माओवाद्यांनी जवांनांवर हल्ला केला होता. यावेळी सीआरपीएफचे तब्बल 76 जवान हुतात्मा झाले होते. साथीदारांच्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश…
नाशिक: विहिरीवर पाणी आणायला गेलेल्या मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगावमध्ये घडली आहे. निताबाई जाधव आणि त्यांची मुलगी इच्छामणी असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. विहिरीतून पाणी ओढत असताना मुलगी पाय घसरून विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी आईनेही उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला आहे. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील कपड्याच्या दुकानाला आज (बुधवार) पहाटे साडे तीनच्या सुमारास भीषण आग लागली होती. एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मृतदेह पाहून अनेकांना रडू कोसळले. पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय? छावणी बाजारमधील महावीर जैन […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…
बीड : लग्नाचा बस्ता खरेदी करून बहिणीसोबत परत येत असताना नवरदेवाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह त्याची बहीण आणि चिमुकल्या भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या युवकाच्या दुचाकीला एसटी बसने दिली. युवकासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई येथे नवरदेवाच्या दुचाकीला एसटी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…
अकोला: घरात लग्नाची तयारी सुरु असताना लग्न ठरलेल्या नववधूला होळीचा सण देण्यासाठी कुटुंब इंदूरला गेले होते. आई-वडिलासह इंदूरवरुन परत येताना मोटारीला अपघात झाला. अपघातामध्ये डॉक्टर निलेश माळोदे आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी रामराव माळोदे यांचा मुलगा दंत […]
अधिक वाचा...पोलिसाने झाडली पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात गोळी अन्…
छत्रपती संभाजीनगर : वाळुजमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या व्यापाऱ्याचा खून प्रकरणाचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच व्यापारी सचिन नरोडे यांना संपवल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड-कॉन्स्टेबल रामेश्वर काळे आणि एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : कुटुंबातील किरकोळ वादानंतर एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी पती आणि दोन लहान मुलींनी धाव घेतली. यात दोन्ही चिमुकल्या मुली गंभीररित्या भाजल्या होत्या. सात महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सहा वर्षीय मुलीचा उपचारावेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली…
बीडः लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. परळी वैजनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) सायंकाळी 6 वाजता बैठक बोलावली […]
अधिक वाचा...अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट…
मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी वडील विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परबी उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता त्यांचे वडील […]
अधिक वाचा...भीषण अपघात! महादेवाची पिंड आणण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाला…
जळगावः जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजता भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला आहे. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात येत […]
अधिक वाचा...
