
उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगे खून प्रकरणी नातेवाईकाला अटक…
नाशिक : उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू भूषण लहामगे यांच्या खून प्रकरणी चुलते यशवंत लहामगेला ताब्यात घेतले आहे. खून प्रकरणातील मुख्य संशयित आणि इतर साथीदार अद्याप फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिक-मुंबई महामार्गावर भूषण लहामगे यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. भरदिवसा झालेल्या या खूनाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी भूषण लहामगे यांच्या पत्नी आदिती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भूषण लहामगे यांचे चुलते यशवंत लहामगेना ताब्यात घेतले आहे. जमिनीच्या वादातून भूषण लहामगे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फरार असलेल्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा होईल.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
भूषण लहामगे घरी परतत असताना त्यांच्यावर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर लहामगे यांच्यावर कोयत्याने वार केले गेले. भूषण यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्या तरी शरिरात एकही गोळी नसल्याचे समोर आले आहे. गोळीबारात गोळ्या त्यांना लागल्या नाहीत. मात्र त्यानंतर कोयत्याने वार केल्याने ते घाव वर्मी बसून भूषण यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
दरम्यान, जमीन आणि पैशाच्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. भूषण यांच्यावर गोळीबार करणारा आणि कोयत्याने वार करणारा त्यांचाच चुलतभाऊ वैभव असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. भूषण यांनी १९९८ ते २००० या कालावधीत अनेक राज्यस्तरीय कुस्त्या खेळल्या. त्यांनी उत्तर महाराष्ट्र श्री हा किताब पटकावला होता. महाराष्ट्र केसरीतही त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. भूषण यांनी लग्नानंतर त्यांच्या दूधविक्रीच्या व्यवसायात लक्ष घातले होते. पूर्ण वेळ ते दुधाचा व्यवसाय करत होते.
नाशिक हादरले! उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या…
नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…
नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने ‘बारक्या’ला पुण्यातून ठोकल्या बेड्या…
नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत पोलिसांच्या ताब्यात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

