राजकीय नेत्याच्या घरावर पोलिसांचा छापा; मिळाल्या धक्कादायक वस्तू…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरात काडतुसांचा मोठा साठा सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये त्यांच्या घरातून 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील विक्रांत सहारे यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची 4 तास शोध मोहिम सुरू होती. या छाप्यात एक तलवार, 1 मॅक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, 40 काडतुसे, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत. विक्रांत सहारे व कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. विक्रांत सहारे हे शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख आहेत, त्यांच्या घरातून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान चालू केले आहे. या अभियानांतर्गत सहारे यांना शस्त्रे विकण्यासाठी काही तरुण येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे यांच्या घरावर छापा टाकला आणि विविध वस्तू मिळाल्या आहेत. पोलिसांनी निलेश पराते आणि अमोल कोलतवार या दोन विक्रेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…

भरधाव फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडलं; उपचारादरम्यान मृत्यू…

सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…

एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!